Xiaomi ने नुकतीच Redmi Note 12 सिरीज लॉन्च केली आहे. लॉन्च झाल्यानंतर Xiaomi ने Redmi 11 Prime च्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. रेडमी 11 प्राइम स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉन्च झाला होता. Redmi 11 प्राइम स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. या दोन्ही स्मार्टफोनच्या व्हेरियंटमध्ये 1,000 रुपयांची कपात जाहीर करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : Samsung Galaxy F04 आज प्रचंड डिस्काउंटसह उपलब्ध, खरेदी कराल का?
Redmi 11 प्राइम स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच लांबीचा फुल HD प्लस डिस्प्ले आहे. यात 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. हा फोन गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन सह येतो. फोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हेलिओ चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोन 64 GB आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये येतो. फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टम सपोर्टसह येतो.
फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मेन कॅमेरा 50MP आहे. तसेच 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच सेल्फीसाठी 8MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. Redmi 11 Prime मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आली आहे.
Redmi 11 प्राइम स्मार्टफोनच्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. या दोन्ही स्टोरेज व्हेरियंटच्या किमतीत 1000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
यानंतर, Redmi 11 Prime च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये राहिली आहे. तर Redmi 11 Prime च्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. Redmi 11 Prime ची नवीन किंमत अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आली आहे. Redmi 11 प्राइम स्मार्टफोन फ्लॅश ब्लॅक आणि प्लेफुल ग्रीन आणि पपी पर्पल कलर पर्यायांमध्ये येतो.