Amazon ग्रेट समर सेलचा लाभ आता केवळ आजच्या दिवस घेता येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला Amazon वरून कोणतेही उपकरण खरेदी करायचे असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. सेलदरम्यान स्मार्टफोन्सवरही डील मिळत आहेत. सेलदरम्यान, Redmi 11 Prime अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. लगेच या संधीचा लाभ घ्या. वाचा सविस्तर –
हा स्मार्टफोन 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. Amazon सेलमध्ये हा फोन बँक ऑफर्ससह खरेदी केल्यास 1250 रुपयांची सूट उपलब्ध आहे. ही ऑफर सर्व बँक कार्ड पेमेंटवर उपलब्ध असणार आहे. तसेच, ICICI बँकेच्या कार्डवर 750 रुपयांची सूट आहे. येथून खरेदी करा
त्याबरोबरच, EMI पर्याय देखील मिळत आहे, EMI 526 रुपयांपासून सुरु होईल. तसेच, नो कॉस्ट EMI पर्याय मिळणार आहे. जर तुम्हाला जुना फोन एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हला 10,200 रुपयांची सूट मिळू शकते. हा फोन तुम्हाला फ्लॅशी ब्लॅक, प्लेफुल ग्रीन आणि पर्पल कलरमध्ये खरेदी करता येईल.
या Redmi फोनमध्ये 6.58-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz पर्यंत आहे. डिव्हाइस कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो. यामध्ये रीडिंग मोड 3.0 देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देखील आहे. फोन AI फेस अनलॉक फिचर आणि साइड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.
फोनचा बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 64GB स्टोरेजचा आहे. तर, टॉप व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येणार आहे. याशिवाय, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.
फोनच्या मागील बाजूस 50MP AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मेन कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोरील बाजूस 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.