Redmi ने आज आपला बजेट 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. Mediatek Dimensity 700 chipset सह येणारा Redmi चा हा पहिला 5G फोन आहे. फोन 5000 mAh बॅटरी आणि 50MP AI कॅमेराने सुसज्ज आहे. Redmi 11 Prime 5G सोबत, कंपनीने आज त्याचे 4G व्हेरिएंट देखील लाँच केले आहे. 4G स्मार्टफोनची किंमत 5G पेक्षा कमी ठेवण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट आता OTT वर येण्यासाठी सज्ज, 'या' दिवशी बघता येईल चित्रपट
Xiaomi चा हा फोन 9 सप्टेंबरला पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध होईल. ICICI बँक कार्डने फोन खरेदी केल्यास 1000 रुपयांची झटपट सूटही दिली जात आहे. Redmi 11 Prime 5G च्या 4GB + 64GB वर्जनची किंमत 13,999 रुपयांपासून सुरू होते, तर 6GB रॅम + 128GB वर्जनची किंमत 15,999 रुपये आहे. हा फोन मेडो ग्रीन, क्रोम सिल्व्हर आणि थंडर ब्लॅक या तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.
Redmi 11 Prime 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. हा Widevine L1 सपोर्टसह येतो, अर्थात हा Netflix, YouTube, इ. वर फुल HD कंटेंट सपोर्ट करेल. शिवाय, Redmi 11 Prime 5G 7nm चिपसेट डिझाइनवर आधारित Mediatek Dimensity 700 प्रोसेसरवर चालतो. फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह येतो. फोन व्हर्च्युअल रॅम बूस्टरला सपोर्ट करतो. चांगल्या कार्यक्षमतेसाठी हे 5G पॉवर मॉडेमसह येते. यात ड्युअल 5G स्टँडबाय आहे त्यामुळे दोन्ही स्लॉट 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतील.
त्याबरोबरच, Redmi 11 Prime 5G फोन 5000 mAh बॅटरी आणि 22.5W चार्जरसह येतो. फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे, जो हाय-रेस सर्टिफाईड आहे. फोन आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो. या फोनमध्ये मागील बाजूस 50MP एन कॅमेरा आणि त्यासोबत डेप्थ सेन्सर आहे. स्मार्टफोन नाईट मोडला देखील सपोर्ट करतो. आकर्षक सेल्फीसाठी यात कॅमेरा 8MP चा आहे.