Redmi आज पहिल्यांदाच आपला नुकताच लॉन्च केलेला बजेट स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. कंपनीने 6 सप्टेंबर रोजी Redmi 11 Prime 5G आणि Redmi A1 सादर केला आहे. मात्र, Redmi A1 आज दुपारी 4 वाजता विक्रीसाठी जाईल, तर Redmi 11 Prime 5G पहिल्यांदाच दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होईल. या सेलशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती बघुयात…
हे सुद्धा वाचा : Twitter New Feature: ऍपवर लवकरच उपलब्ध होणार WhatsApp बटन, एका क्लिकवर ट्विट शेअर होईल
तुम्ही mi.com आणि ई-कॉमर्स साइट Amazon वरून Redmi 11 Prime 5G आणि Redmi A1 खरेदी करू शकता.
हा 5G फोन Mediatek Dimensity 700 प्रोसेसरवर चालतो. फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह येतो. फोन व्हर्च्युअल रॅम बूस्टरला सपोर्ट करतो. यात ड्युअल 5G स्टँडबाय आहे त्यामुळे दोन्ही स्लॉट 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतील. Redmi 11 Prime 5G 90Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले दाखवतो. फोनमध्ये मागील बाजूस 50MP मेन कॅमेरा आणि त्यासोबत डेप्थ सेन्सर आहे. स्मार्टफोन नाईट मोडला देखील सपोर्ट करतो. सेल्फी कॅमेरा 8MP चा आहे. Redmi 11 Prime 5G बॉक्समध्ये 5000 mAh बॅटरी आणि 22.5W चार्जरसह येतो.
Redmi A1 मध्ये 6.52-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे आणि वरच्या बाजूला एक स्पीकर आहे. फोनमध्ये FM रेडिओ ऍप देखील येतो. Redmi A1 मध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी आहे. Redmi A1 मध्ये Mediatek Helio A22 चिपसेट आहे. हे 2GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. Redmi A1 फोनमध्ये 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. हे HD व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या क्षमतेसह येते. Redmi A1 मध्ये पोर्ट्रेट मोड देखील उपलब्ध आहे.
Redmi A1 भारतात एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 6,499 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने हे सिंगल व्हेरिएंट 2 GB + 32 GB सह सादर केले आहे. त्याच्या विक्रीच्या ऑफर अजून समोर आलेल्या नाहीत. तसेच, Redmi 11 Prime 5G च्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. पण ICICI बँकेच्या कार्डने फोन खरेदी केल्यास 1000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. यासोबतच तुम्हाला फोनवर जबरदस्त एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळेल.