Redmi ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 10A Sport भारतात लाँच केला आहे. Redmi ने आपल्या Redmi 10 सीरीज मध्ये 5000mAh बॅटरी सह एक नवीन फोन लाँच केला आहे. नवीन Redmi 10A स्पोर्ट बजेट किमतीत खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. Redmi 10A मध्ये 13 मेगापिक्सेल रियर कॅमेरा, 6.53 इंच डिस्प्ले यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात नवीन स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती…
हे सुद्धा वाचा : OnePlus 10T 3 ऑगस्ट रोजी होणार लाँच, मिळणार 150W फास्ट चार्जिंगसह अनेक उत्तम फीचर्स
Redmi 10A Sport मध्ये 6.53 इंच HD+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1600 x 720 पिक्सेल आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोनमध्ये 2 GB व्हर्च्युअल रॅमचा पर्याय उपलब्ध आहे.
Redmi 10A Sport मध्ये मागील बाजूस सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये एपर्चर F/2.2 सह 13-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि उत्तम व्हिडिओ कॉलिंगसाठी पंच-होल कटआउटमध्ये 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. फोन Android 11 OS आधारित MIUI 12.5 सह येतो. फोनमध्ये डेटा ट्रान्सफर आणि चार्जिंगसाठी मायक्रो-USB पोर्ट आहे. Redmi च्या या हँडसेटमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक, ड्युअल-सिम, Wi-Fi देण्यात आली आहेत. फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.
हा स्मार्टफोन देशात एकाच 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन चारकोल ब्लॅक, स्लेट ग्रे आणि सी ब्लू कलर वेरिएंटमध्ये खरेदी करता येईल. रेडमी हँडसेट देशातील Amazon India आणि Mi Store वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ऍमेझॉन वर केवळ 10,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. येथून खरेदी करा…