Realme चे आगामी आणि बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेले स्मार्टफोन्स अखेर आज लाँच होण्यासाठी सज्ज झाले आहेत. होय, Realme 11 5G, Realme 11X 5G आणि Realme Buds Air 5 सिरीज आज भारतात लाँच होणार आहेत. रियलमीचे हे सर्व उपकरण कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. Realme 11 आणि Realme 11X 5G ड्युअल रीअर कॅमेरा आणि रिंग्ड कॅमेरा मॉड्यूलसह येतील.
यासह, वर सांगितल्याप्रमाणे Realme Buds Air 5 सिरीजदेखील लाँच होणार आहे. या सिरीजमध्ये दोन इयरबड Realme Buds Air 5 आणि Realme Buds Air 5 Pro सादर केले जातील, जे अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) फिचरसह येतील.
Realme 11 आणि Realme 11X 5G चा लॉन्च इव्हेंट आज म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर तसेच ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर पाहता येईल. किंवा तुम्ही खाली दिलेल्या व्हीडिओवर देखील हा लाँच इव्हेंट बघू शकता.
लाँच टाइमसोबतच कंपनीने पुष्टी केली आहे की, फोनसाठी 'अर्ली बर्ड' सेल देखील आज असणार आहे. हा सेल 23 ऑगस्ट रोजी म्हणजे आज संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल, जो रात्री 8 वाजेपर्यंत चालेल. तब्बल दोन तास तुमच्यासाठी हा सेल लाईव्ह असणार आहे. तुम्ही Realme.com आणि Flipkart साइटद्वारे या सेलचा लाभ घेऊ शकता.
Realme चे हे दोन्ही फोन 6.72-इंच लांबीच्या IPS LCD डिस्प्लेसह येतील. डिस्प्ले FHD + रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्टसह येऊ शकतो. या दोन्ही फोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ 6nm प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. जो 8GB RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करेल. फोनची रॅम आणि स्टोरेज वाढवता येण्याजोगी असेल.
Realme चे हे दोन्ही फोन डुअल रियर कॅमेरा सेटअप सह येतील. Realme 11 5G ला 108MP मेन कॅमेरासह येईल. 108MP मेन कॅमेरासह अधिक डीटेल्ड इमेज मिळते, जी डिजिटली झूम केली जाऊ शकते. याशिवाय फोनच्या मागील बाजूस 2MP डेप्थ सेन्सर आणि LED फ्लॅशलाइट मिळेल. तर, Realme 11X 5G मध्ये 64MP मेन कॅमेरा दिला जाईल. हे दोन्ही फोन 16MP सेल्फी कॅमेरा सह येऊ शकतात. 16MP फ्रंट कॅमेरा हे स्मार्टफोन विभागातील एक उत्तम फिचर आहे आणि ते सुंदर आणि तपशीलवार सेल्फी घेण्यास सक्षम आहे.
Realme 11 5G मध्ये 5000mAh बॅटरी सोबत 67W फास्टिंग का सपोर्ट, सध्या Realme 11X 5G मध्ये 5000mAh बॅटरीसोबत 33W फास्टिंग का सपोर्ट मिळू शकतो. वेब सर्फिंग आणि काही मूलभूत कार्ये करताना ही बॅटरी तब्बल दोन दिवस चालेल.