Realme 11 Pro च्या प्री-बुकिंगवर 4,499 रुपयांची स्मार्टवॉच फ्री, वाचा ऑफर डिटेल्स
Realme 11 Pro सिरीजचे प्री-बुकिंग 8 जून ते 11 जून दरम्यान होणार
हा Realme फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर देखील सूचीबद्ध
सिरीजची प्री-ऑर्डर करणाऱ्या वापरकर्त्यांना 4,499 रुपयांची Realme's Watch 2 Pro मोफत मिळेल.
Realme 11 Pro सीरीज लवकरच भारतासह युरोपियन मार्केटमध्ये लाँच होणार आहे. Realme ची ही सिरीज 11 जून रोजी सादर केली जाईल, अशी माहिती मिळाली आहे. Realme च्या या स्मार्टफोन सीरीजच्या प्री-बुकिंगची तारीख लीक करण्यात आली आहे. ज्यामध्ये यूजर्सला Realme Watch 2 Pro यासह मोफत देण्यात येईल. हा Realme फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर देखील सूचीबद्ध करण्यात आला आहे.
Realme 11 Pro सिरीजचे प्री-बुकिंग ऑफर डिटेल्स
Realme 11 Pro सिरीजचे प्री-बुकिंग 8 जून ते 11 जून या कालावधीदरम्यान सुरु असणार आहे. या आगामी Realme स्मार्टफोन सिरीजची प्री-ऑर्डर करणाऱ्या वापरकर्त्यांना 4,499 रुपयांची Realme's Watch 2 Pro मोफत मिळेल, अशी माहिती मिळाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की,सीरीजचे प्री-बुकिंग आणि ऑफर तपशील टिपस्टर सुधांशू यांनी शेअर केले आहेत.
Realme 11 Pro ची लीक किमंत
realme 11 Pro Series 5G Global prices (in USD)#realme11Pro
8GB+128GB: $289
8GB+256GB: $309#realme11ProPlus
8GB+256GB: $329
12GB+512GB: $369#realme11ProSeries5G pic.twitter.com/wJjb2oIbED— Sudhanshu Ambhore (@Sudhanshu1414) June 4, 2023
Realme 11 Pro Series ची किंमत लीक झाली आहे. फोनचा बेस 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $289 म्हणजेच सुमारे 23,814 रुपये असू शकते. तर टॉप मॉडेल 12GB RAM आणि 512GB स्टोरेजची किंमत $369 म्हणजेच सुमारे 30,406 रुपये असण्याची शक्यता आहे.
Realme 11 Pro सिरीजचे अपेक्षित तपशील
Realme 11 Pro सीरीज चीनमध्ये लाँच करण्यात आली असून, यामध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ 5G हे दोन फोन मॉडेल्स येतात. दोन्ही स्मार्टफोन 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आणि समान फीचर्ससह येतात. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हे फोन MediaTek Dimensity 7050 chipsetसह कार्य करतात.
त्याबरोबरच, Realme 11 Pro मध्ये 100MP प्रायमरी, 2MP मॅक्रो लेन्स आणि सेल्फीसाठी 16MP कॅमेरा उपलब्ध असेल. तर, Realme 11 Pro+ 5G मध्ये 200MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो लेन्स आणि सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल. हे दोन्ही फोन 5000mAh बॅटरीसह येण्याची शक्यता आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile