Realme ने सादर केली 240W चार्जिंग टेक्नॉलॉजी, Realme GT Neo 5 सह होईल एंट्री

Realme ने सादर केली 240W चार्जिंग टेक्नॉलॉजी, Realme GT Neo 5 सह होईल एंट्री
HIGHLIGHTS

Realme ने आपले नवीन 240W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान सादर केले आहे.

हा चार्जिंग स्पीड Realme GT Neo 5 सह जोडला जाईल.

कमी पावरफूल GT Neo 5 150W चार्जिंग स्पीडसह लॉन्च होईल.

अनेक लीक आणि टीझर्स नंतर, Realme ने अखेर नवीन 240W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर केली आहे. काही दिवसांपूर्वी या 240W चार्जरची कथित लाईव्ह इमेज ऑनलाइन समोर आली होती. विशेष म्हणजे, या चार्जरमध्ये SuperVOOC ब्रँडिंग होते आणि ते Realme GT Neo 5 सह बंडल असण्याची अफवा आहे. SuperVOOC नाव OPPO शी संबंधित आहे. शिवाय, अहवालात असेही सूचित केले आहे की, कमी पावरफुल GT निओ 5 150W चार्जिंग स्पीडसह लॉन्च होईल.

हे सुद्धा वाचा : WhatsApp कडून युजर्ससाठी मोठं गिफ्ट! आता इंटरनेटशिवाय करता येईल चॅट

Realme चा दावा आहे की, त्यांनी 98.5 टक्के चार्जिंगपर्यंत पोहोचण्यासाठी थ्री-वे 100W चार्ज पंप पॅरलल डिझाइन, 20V 12A इनपुट आणि 10V 24A आउटपुट वापरले आहे. कंपनी कस्टमने 21AWG जाड तांब्याच्या तारांसह 12A चार्जिंग केबल तयार केली, ज्यामुळे मागील जनरेशनच्या चार्जिंग सोल्यूशन्सच्या तुलनेत वाहून नेण्याची क्षमता 20 टक्क्यांनी वाढली.

Realme 240W Dual GaN चार्जिंग सोल्यूशनमध्ये 13 तापमान सेन्सर्स, PS3 फायरप्रूफ डिझाइन, रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टम आणि 6580 mm2 ग्राफीन फेज-चेंज कूलिंग मटेरियल समाविष्ट आहे. Realme या 240W फास्ट चार्जिंग सोल्यूशनसह 1,600 चार्जिंग सायकलचा दावा करते.

 

 

OPPO 240W FAST CHARGING

OPPO ने आपले 240W चार्जर तंत्रज्ञान आधीच दाखवले आहे, जे फोन 9 मिनिटांत 100 टक्के चार्ज करते. OPPO व्यतिरिक्त, Xioami त्याच्या Redmi Note 12 Explorer Edition सह 210W फास्ट चार्जर पाठवत आहे आणि दावा करतो की तो फोन 9 मिनिटांत 100 टक्के चार्ज करेल. मात्र, चाचणीत ते दाव्यापेक्षा थोडे कमीच ठरले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo