काही आठवड्यांपूर्वीच Realme ने अधिकृतपणे हि घोषणा केली होती कि हा पहिला असा ब्रँड बनेल जो Helio P70 असलेला डिवाइस लॉन्च करेल. आता ती वेळ आली आहे. आज कंपनी Realme की U सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन Realme U1 लॉन्च करणार आहे. हा लॉन्च इवेंट नवी दिल्लीत दुपारी 12:30 वाजता आयोजित होईल. विशेष म्हणजे अजूनतरी कंपनी ने या स्मार्टफोनच्या किंमतीचा अधिकृतरीत्या खुलासा करण्यात आला आंही आणि याची उपलब्धता पण सांगितली नाही. त्यामुळे या लॉन्च मध्ये याची किंमत समजेल.
विशेष म्हणजे कंपनीचा दावा आहे कि ते एक असा स्मार्टफोन आणणार आहेत जो जगातील पहिला MediaTek Helio P70 प्रोसेसर वर चालणार स्मार्टफोन असेल. या फोन मध्ये सिक्युरिटी अपडेट्स वर जास्त फोकस करण्यात आला आहे. असे बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन आल्यानंतर याची किंमत Realme 2 Pro पेक्षा पण जास्त असेल. U सिरीज लाइनचा भाग असणाऱ्या या स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा कंपनी ने अजूनही केला नव्हता पण आता स्पष्ट झाले आहे कि हा डिवाइस Realme U1 च आहे.
तुम्हाला सांगू इच्छितो कि Helio P70 SoC एक octa-core चिपसेट आहे जो 12nm FinFET वर आधारित आहे. मीडियाटेक चे म्हणणे आहे कि Helio P70 chipset Helio P60 च्या तुलनेत 13 टक्के जास्त चांगला परफॉर्म करतो. सोबतच हा प्रोसेसर AI इंजिन सह येतो ज्यात Helio P60 पेक्षा 30 टक्क्यांचा सुधार करण्यात आला आहे. अशाप्रकारे या फोनचा प्रोसेसरच याची खासियत असेल. या स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपये आणि 15,000 रुपयांच्या आत असण्याची शक्यता आहे. Amazon.in वर हा डिवाइस लॉन्च नंतर एक्सक्लूसिव सेल वर उपलब्ध केला जाऊ शकतो. तसेच कंपनी इवेंट मध्ये लॉन्च ऑफर्सचा पण खुलासा करू शकते.
अशाप्रकारे बघा इवेंट ची लाइव स्ट्रीम
Realme U1 चा लॉन्च लाइव स्ट्रीम केला जाईल. हि लाइव स्ट्रीमिंग कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेज द्वारे केली जाईल. असे आशा आहे कि Realme आपल्या आगामी U-series स्मार्टफोनचे YouTube channel आणि Facebook page सोबत आपल्या अधिकृत RealmeTwitter हँडेल वर पण लाइव पोस्ट अपडेट्स करेल.