Realme U1 मोबाईल फोन 28 नोव्हेंबरला लॉन्च केला जाणार आहे, पण याच्या लॉन्चच्या जवळपास एक आठवड्यापूर्वीच हा डिवाइस इंटरनेट वर दिसला आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनीचे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर माधव सेठ यांना या डिवाइस मधून एक फोटो घेताना कॅप्चर करण्यात आले आहे. हा फोटो सर्वात आधी 91Mobiles च्या एका रिपोर्ट मध्ये दिसला होता. त्यानंतर माधव सेठ यांनीच एका ट्विट मधून एक फोटो शेअर केला आहे, जी या आगामी फोनच्या कॅमेरा मधून घेण्यात आली आहे.
नुकतेच समोर आले आहे कि Realme चा हा U सीरीजचा आगामी स्मार्टफोन जगातील पहिला असा मोबाईल फोन असणार आहे, जो मीडियाटेक Helio P70 चिपसेट सह लॉन्च केला जाईल, याबद्दल माहिती पण समोर आली आहे.
सोबतच असे पण सांगण्यात येत आहे कि हा स्मार्टफोन आल्यानंतर याची किंमत Realme 2 Pro पेक्षा पण जास्त असेल. रियलमी चा आगामी फोन U सिरीज चा भाग असेल. याचा खुलासा कंपनी कडून करण्यात आला आहे. कंपनी कडून हि माहिती ट्विटर वर देण्यात आली आहे. Realme ने अजूनतरी आगामी डिवाइस किंवा त्यांच्या लाँच संबंधित कोणतेही डिटेल शेयर केले नाहीत. असा अंदाज लावला जात आहे कि कंपनी डिवाइस Realme U किंवा U1 नावाने लॉन्च करू शकते.
तुम्हाला सांगू इच्छितो कि Helio P70 SoC एक octa-core चिपसेट आहे जो 12nm FinFET वर आधारित आहे. मीडियाटेक चे म्हणणे आहे कि Helio P70 chipset Helio P60 च्या तुलनेत 13 टक्के जास्त चांगला परफॉर्म करतो. सोबतच हा प्रोसेसर AI इंजिन सह येतो ज्यात Helio P60 पेक्षा 30 टक्क्यांचा सुधार करण्यात आला आहे.
आता हे बघावे लागेल कि कंपनी हा डिवाइस आणल्यानंतर आपल्या कॉम्पिटिटिव प्राइसिंग पॉलिसी वर कायम राहते कि नाही. यामागील कारण असे कि कंपनी ने रुपया मधील घसरणीमुळे Realme C1 आणि Realme 2 च्या किंमती वाढवल्या आहेत.