Realme लवकरच आपला नवीन स्मार्टफोन Realme A1 नावाने करू शकते लॉन्च

Updated on 27-Dec-2018
HIGHLIGHTS

Realme ने आतापर्यंत भारतात आपले पाच स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत आणि आता कंपनीच्या अजून एका नवीन स्मार्टफोन बद्दल चर्चा सुरु झाली आहे जो Realme A1 नावाने लॉन्च केला जाईल.

महत्त्वाचे मुद्दे

  • एक बजेट फोन असेल Realme A1
  • Rs 10,000 च्या श्रेणीत लॉन्च होऊ शकतो हा फोन
  • आता पर्यंत रियलमीचे पाच फोन्स भारतात झाले आहेत लॉन्च

ओप्पोची सब-ब्रँड असणारी रियलमी कंपनी यावर्षी भारतीय स्मार्टफोन बाजरात मोठा प्लेयर म्हणून समोर आली आहे. कंपनीने सहा महिन्यांपूर्वी देशात स्मार्टफोन्स लॉन्च करायला सुरवात केली होती आणि आता पर्यंत Realme आपले पाच स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. रियलमीच्या लॉन्च झालेल्या फोन्स मध्ये Realme 1, Realme 2, Realme 2 Pro, Realme C1 आणि Realme U1 यांचा समावेश आहे. Realme U1 कंपनीचा नवीन डिवाइस आहे आणि हा कंपनीचा पहिला सेल्फी-सेंट्रिक डिवाइस म्हणून लॉन्च केला गेला आहे. आता पुढील एका बजेट स्मार्टफोन Realme A1 च्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.

आता पर्यंत रियलमी ने भारतात आपल्या Realme सीरीज, Realme C सीरीज आणि Realme U सीरीजचे फोन्स लॉन्च केले आहेत आणि आपला पोर्टफोलियो वाढवण्यासाठी कंपनी आपली नवीन Realme A-सीरीज लॉन्च करू शकते. DroidShout नुसार Realme चा पुढील स्मार्टफोन Realme A असेल आणि बजेट फोन्स Realme C1 आणि Realme 2 सोबत याचा समावेश होईल.

खास बाब अशी कि Realme A1 कंपनी के Realme U1 नंतर येईल. Realme U1 ची भारतातील किंमत Rs 11,999 आहे. त्यामुळे अंदाज लावला जात आहे कि Realme A1 स्मार्टफोन Rs 10,000 च्या श्रेणीत लॉन्च केला जाईल. हा डिवाइस Realme 2 पेक्षा चांगले स्पेक्स ऑफर करू शकतो आणि हा ब्लॅक आणि येलो रंगांत लॉन्च केला जाऊ शकतो, पण अजूनतरी डिवाइसच्या हार्डवेयर बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

रियलमीच्या शेवटच्या काही स्मार्टफोन्स मध्ये वॉटर-स्टाइल ड्रॉप नॉच देण्यात आली आहे आणि अशा आहे कि Realme A1 स्मार्टफोन पण त्याच डिजाइन सह लॉन्च केला जाईल. डिवाइस मध्ये एक मोठा डिस्प्ले असेल पण डिस्प्लेच्या साइज आणि प्रोसेसरची माहिती समोर आली नाही . Realme असा [पाहिली अशी स्मार्टफोन निर्माता होती जिने मीडियाटेक हीलिओ P70 चिपसेट सह आपला Realme U1 स्मार्टफोन लॉन्च केला होता. कंपनीचे CEO माधव सेठ यांनी सांगितले होते कि कंपनी येत्या काळात मीडियाटेक द्वारा संचालित अजून फोन्स पण लॉन्च करू शकते त्यामुळे Realme A1 पण मीडियाटेक प्रोसेसर सह सादर केला जाणार असल्याची शक्यता आहे.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :