Realme चे चीफ मार्केटिंग ऑफिसर (CMO), Xu Qi Chase यांनी आगामी Realme Q स्मार्टफोनच्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशंसचा खुलासा केला आहे. Chase ने वेबो द्वारे सांगितले आहे कि स्मार्टफोन 5 सेप्टेंबरला लॉन्च केला जाईल. फोन मध्ये 4035mAh ची बॅटरी मिळेल जी 20W VOOC फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करेल.
Realme Q ची बॅटरी कॅपेसिटी आणि इतर स्पेसिफिकेशंस Realme CMO ने शेअर केले आहेत. स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 चिपसेट द्वारा संचालित असेल जो रियलमी 5 प्रो सारखाच आहे. फोन ColorOS 6 वर लॉन्च केला जाऊ शकतो जो एंड्राइड 9 पाई वर आधारित असेल.
Realme ने गेल्या आठवड्यात घोषणा केली होती कि Realme Q सीरीज 5 सेप्टेंबरला सादर केली जाईल. स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च होईल. कंपनीने स्नॅपड्रॅगॉन 712 कडे इशारा केला आहे. स्मार्टफोन मध्ये 48MP कॅमेरा असल्याच्या बातम्या पण येत आहेत. तसेच, टीजर पोस्टर आणि लीक झालेल्या इमेज वरून समजले आहे कि Realme Q भारतात लॉन्च झालेल्या Realme 5 Pro चा री-ब्रँडेड वर्जन असेल. Realme XT पण लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन कंपनीचा पहिला फोन आहे जो 64MP कॅमेरा सह आला आहे.
Realme XT मोबाईल फोन एका 6.4-इंचाच्या सुपर AMOLED डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे, जो वाटर-ड्राप नॉच सह येतो. तसेच हा एक FHD+ पॅनल आहे. Realme ने आपल्या या मोबाईल फोन मध्ये एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण दिला आहे. हा मोबाईल फोन तीन वेगवेगळ्या मॉडेल मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा मोबाईल फोन तुम्ही 4GB रॅम, 64GB स्टोरेज, 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्यतिरिक्त 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह घेऊ शकता. सोबतच या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 प्रोसेसर पण मिळत आहे.
इतकेच नव्हे तर या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, जी VOOC 3.0 फास्ट चार्जिंग सह येते. फोन एंड्राइड 9 पाई वर लॉन्च केला गेला आहे. तसेच जर कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर या मोबाईल फोन मध्ये म्हणजे Realme XT मध्ये तुम्हाला एक 64MP चा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळत आहे, सोबतच या मोबाईल फोन मध्ये इतर काही सेंसर पण आहेत. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 8MP चा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा मिळत आहे. त्याचप्रमाणे यात तुम्हाला एक 2MP चा डेप्थ सेंसर मिळत आहे. तसेच या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 2MP चा मॅक्रो सेंसर पण मिळत आहे.