Latest Realme Pad 2 जबरदस्त डिस्प्लेसह अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स। Tech News 

Latest Realme Pad 2 जबरदस्त डिस्प्लेसह अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स। Tech News 
HIGHLIGHTS

Realme Pad 2 अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे.

Realme Pad 2 टॅब 17,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.

Realme Pad 2 ची अर्ली बर्ड सेल 19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होऊन 25 एप्रिलपर्यंत चालेल.

Realme ने आपला नव टॅब Realme Pad 2 अखेर भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा टॅब कंपनीच्या नवीन Realme P सीरीज स्मार्टफोन्सच्या लाँच दरम्यान सादर करण्यात आला आहे. नावावरून समजलेच असेल की, हा टॅब Realme Pad ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा टॅब Mediatek Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज आहे. टॅबमध्ये 8MP बॅक आणि तब्बल 8360mAh बॅटरी मिळणार आहे, ज्यासोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. जाणून घेऊयात टॅबची किंमत, उपलब्धता आणि सर्व तपशील-

Realme Pad 2

Realme Pad 2 ची भारतीय किंमत

Realme ने Realme Pad 2 तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. त्याच्या WIFI 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. तर, LTE 6GB + 128GB ची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याबरोबरच, LTE 8GB+256GB व्हेरिएंट 22,999 रुपयांमध्य सादर करण्यात आला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Realme Pad 2 ची अर्ली बर्ड सेल 19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होऊन 25 एप्रिलपर्यंत चालेल.

Realme Pad 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme Pad 2 मध्ये 11.5 इंच लांबीचा डिस्प्ले आहे, डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा टॅब Mediatek Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासोबतच, तुम्हाला टॅबमध्ये 8GB व्हर्चुअल रॅमचा सपोर्टही मिळेल. अशा प्रकारे, टॅबमध्ये एकूण 16GB रॅमचा सपोर्ट उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, टॅबचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.

REALME PAD IN AMAZON SALE

फोटोग्राफीसाठी या टॅबमध्ये 8MP AI रियर कॅमेरा मिळणार आहे. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. टॅबमध्ये 8360mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. या टॅबमध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्टही उपलब्ध आहे. टॅबमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 2 मायक्रोफोन्स देखील आहेत, जे ड्युअल माईक नॉइज कॅन्सलेशनसह येतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo