Realme P3 Ultra Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल आज! जाणून घ्या ऑफर्स आणि आकर्षक फीचर्स

Updated on 25-Mar-2025
HIGHLIGHTS

Realme P3 Ultra 5G मागील आठवड्यात भारतात लाँच

Realme P3 Ultra 5G स्मार्टफोनची विक्री दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart वर लाईव्ह होईल.

Realme.com वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 3000 रुपयांची त्वरित सूट

Realme P3 Ultra Sale: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme P3 Ultra 5G अलिडकेच मागील आठवड्यात भारतात लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर, आज भारतात हा फोन पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनची विक्री दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart वर लाईव्ह होईल. या काळात फोन कमी किमतीत खरेदी करता येईल. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये पॉवरफूल 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा आहे. जाणून घ्या Realme P3 Ultra ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: Vivo T4 5G: लाँचपूर्वीच आगामी फोनची किंमत, फीचर्स Leak! मोठी बॅटरी, जबरदस्त कॅमेरासह सज्ज

Realme P3 Ultra ची किंमत आणि ऑफर्स

Realme च्या नवीन स्मार्टफोन Realme P3 Ultra 5G च्या 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. तर, त्याचा 12GB+ 256GB स्टोरेज मॉडेल 27,999 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाइसवर बंपर डिस्काउंट आणि कॅशबॅक उपलब्ध असेल. तसेच, दरमहा 1,322 रुपयांचा EMI उपलब्ध असेल.

realme p3 ultra 5g realme p3 ultra 5g

तसेच, Realme.com वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 3000 रुपयांची त्वरित सूट मिळेल. यासाठी निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार करावे लागेल.

Realme P3 Ultra चे फीचर्स आणि स्पेक्स

Realme P3 Ultra 5G यात 6.83 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, डिस्प्लेच्या यात संरक्षणासाठी कॉर्निंग Corning Gorilla Glass 7i बसवण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा नवीनतम फोन Android 15 ने सुसज्ज असलेल्या realme UI 6.0 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Realme च्या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX896 सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी हँडसेटच्या 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 6000mAh जंबो बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :