Realme P3 5G with IP69 waterproof and more features launched in india
Realme ने Realme P3 5G स्मार्टफोनची विक्री आज 26 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून भारतात सुरू झाली आहे. कंपनीने Realme P3 Ultra सोबत हा फोन सादर केला होता. अल्ट्रा व्हेरिएंटची विक्री 25 मार्चपासून सुरू झाली आहे, तर आता तुम्ही आजपासून Realme P3 5G मॉडेल देखील खरेदी करू शकता. हा फोन कंपनीने कमी किमतीत सादर केला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. जाणून घ्या Realme P3 5G फोनची किंमत, ऑफर्स आणि फीचर्स-
Also Read: 85,000 रुपयांचा AC मिळतोय थेट 45,000 रुपयांना, ‘या’ डील्ससह होईल हजार रुपयांची बचत
Realme P3 5G फोनची विक्री आज 26 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सुरू होत आहे. तुम्ही हा फोन Flipkart आणि Realme च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करण्यास सक्षम असाल. फोनवरील पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 2000 रुपयांची सूट दिली जाईल. तसेच तुम्हाला यावर EMI पर्याय देखील मिळेल.
Realme P3 5G फोनच्या बेस 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. तर, 8GB रॅम + 128GB स्टोरेजची किंमत 17,999 रुपये आहे. 8GB रॅम+ 256GB स्टोरेज या टॉप व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये स्पेस सिल्व्हर, कॉमेट ग्रे आणि नेब्युला पिंक कलर ऑप्शन्स मिळतील.
Realme P3 5G फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा AMOLED Pro-XDR डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची बॅटरी 6000mAh आहे, 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.