Realme P2 Pro 5G आणि Realme Pad 2 Lite ची सेल भारतात सुरु, पहिल्या विक्रीत भारी ऑफर्सचा वर्षाव!

Updated on 26-Sep-2024
HIGHLIGHTS

Realme P2 Pro 5G आणि Realme Pad 2 Lite ची सेल सुरु

Realme P2 Pro 5G फोन तीन व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे.

Realme Pad 2 Lite वर 2000 रुपयांची सूट मिळत आहे.

प्रसिद्ध टेक कंपनी Realme ने अलीकडेच आपली दोन नवी उपकरणे भारतात लाँच केली आहेत. Realme P2 Pro 5G आणि Realme Pad 2 Lite Tab नुकतेच भारतीय बाजारात लाँच करण्यात आले. त्यानंतर, अखेर आज Realme P2 Pro 5G आणि Realme Pad 2 Lite Tab ची पहिली विक्री सुरू झाली आहे. Flipkart Big Billion Days Sale 2024 दरम्यान तुम्हाला हे दोन्ही डिवाइस स्वस्तात मिळणार आहेत. लक्षात घ्या की, आजची ऑफर फक्त Flipkart प्लस वापरकर्त्यांसाठी आहे.

दरम्यान, ही सेल उद्या 27 सप्टेंबरपासून सर्व वापरकर्त्यांसाठी लाईव्ह असणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme P2 Pro 5G आणि Realme Pad 2 Lite टॅबवरील पहिल्या सेलदरम्यान मिळणाऱ्या ऑफर्स-

Realme P2 Pro 5G ची किंमत

कंपनी Realme P2 Pro 5G फोन तीन प्रकारांमध्ये येतो. फोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. तर, 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. शिवाय, 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 2000 रुपयांची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. या फोनच्या 12GB रॅम वेरिएंटवर 3000 रुपयांची सूट आहे. Buy From Here

Realme Pad 2 Lite

Realme Pad 2 Lite ची किंमत

Realme Pad 2 Lite फोन दोन व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे. फोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर, 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये इतकी आहे. पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Realme Pad 2 Lite वर 2000 रुपयांची सूट मिळत आहे. Buy From Here

Realme P2 Pro 5G आणि Realme Pad 2 Lite चे मुख्य तपशील

Realme P2 Pro 5G फोनमध्ये FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देखील उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, यामध्ये एक 8MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

तर दुसरीकडे, Realme Pad 2 Lite फोनमध्ये 2K डिस्प्ले आहे. याशिवाय, हे MediaTek Helio G99 प्रोसेसरने सुसज्ज आहे. टॅबमध्ये 8MP प्राथमिक कॅमेरा आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे. टॅबची बॅटरी 8,300mAh आहे. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :