Realme ने या महिन्यात भारतात आपली नवीन स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. ही सिरीज कंपनीची नवी Powerful सिरीज आहे, जी ‘P सीरीज’ शीर्षकासह सादर केली गेली आहे. या सिरीजअंतर्गत Realme P1 5G आणि Realme P1 Pro 5G हे दोन फोन लाँच करण्यात आले आहेत. यापैकी, Realme P1 Pro 5G फोन आज 30 एप्रिल रोजी प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या सेलदरम्यान हा फोन फक्त 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. चला तर मग जाणून घेऊयात Realme P1 Pro ची किंमत, विक्री, ऑफर आणि फीचर्स-
Realme P1 Pro 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. तर, फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये इतकी इतकी आहे. Realme P1 Pro 5G फोन कंपनीच्या वेबसाइट आणि शॉपिंग साइट Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध असेल. Realme P1 Pro 5G फोन Phoenix Red आणि Parrot Blue कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये 2,000 रुपयांची सवलत दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. कंपनी फ्लिपकार्टवर UPI व्यवहार करणाऱ्या वापरकर्त्यांना 300 रुपयांची अतिरिक्त सूट देखील देईल. हा फोन नो कॉस्ट EMI अंतर्गत देखील खरेदी केला जाऊ शकतो.
Realme P1 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा OLED पॅनेलवर बनवलेला कर्व डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 6 Gen 1 octacore प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या विशेष फिचरबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये Rainwater Smart Touch देखील मिळेल.
फोटोग्राफीसाठी, Realme P1 Pro च्या मागील पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा देखील उपलब्ध आहे. मागील कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा मुख्य सेन्सर आहे जो OIS तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. यासोबतच, फोनमध्ये 8MP पोर्ट्रेट लेन्स आहे. सेल्फीसाठी हा Realme फोन 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवरसाठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येईल. या तंत्रज्ञानाच्या मदतीने फोनची बॅटरी 30 मिनिटांत 50% चार्ज होऊ शकते आणि ती पूर्ण चार्ज होण्यासाठी 67 मिनटांचा वेळ हवा, असे कंपनीने सांगितले आहे.