नव्या स्टोरेज व्हेरिएंटसह Realme P1 Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व डिटेल्स 

नव्या स्टोरेज व्हेरिएंटसह Realme P1 Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व डिटेल्स 
HIGHLIGHTS

Realme ने एप्रिल महिन्यात आपली नवी 'P' सिरीज सुरू केली आहे.

सिरीजअंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन Realme P1 5G आणि Realme P1 Pro 5G लाँच केले.

आता कंपनीने Realme P1 Pro चे नवे 12GB रॅम मॉडेल लाँच केले आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अलिडकेच एप्रिल महिन्यात ‘P’ सिरीज सुरू केली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने भारतात दोन नवीन स्मार्टफोन Realme P1 5G आणि Realme P1 Pro 5G लाँच केले. हे दोन्ही स्मार्टफोन मिड बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, आता ‘Pro’ मॉडेलला आणखी पॉवरफुल बनवत कंपनीने Realme P1 Pro चे नवे 12GB रॅम मॉडेल लाँच केले आहे. जाणून घेऊयात Realme P1 Pro 5G ची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: लेटेस्ट Realme GT 6 5G ची पहिली सेल भारतात आज होणार सुरु, जाणून घ्या किंमत आणि Best ऑफर

Realme P1 Pro 5G नव्या व्हेरिएंटची किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने भारतात Realme P1 Pro 5G चा 12GB रॅम वेरिएंट लाँच केला आहे. हा नवीन व्हेरिएंट 256GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे, ज्याची किंमत 22,999 रुपये आहे. तसेच लक्षात घ्या की, Realme P1 Pro 5G फोन 8GB रॅमसह लाँच करण्यात आला होता, जो 128GB आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो.

Realme P1 pro

आम्ही तुम्हाला सांगतो की, 8GB + 128GB व्हेरिएंटची 19,999 रुपये इतकी आहे. तर, 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये इतकी आहे. हा फोन फिनिक्स रेड आणि पॅरोट ब्लू कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.

Realme P1 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme P1 Pro 5G मध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD + स्क्रीन आहे. हा एक कर्व डिस्प्ले आहे, जो OLED पॅनेलवर 120Hz रिफ्रेश रेटच्या समर्थनासह आहे. Realme P1 Pro 5G फोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी Qualcomm Snapdragon 6 Gen 1 octa-core प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. फोनच्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, रेनवॉटर स्मार्ट टच फीचर फोनमध्ये उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी, Realme स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सपोर्ट करतो. ज्याच्या मागील पॅनलवर 50MP OIS सेन्सर आणि 8-मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, ज्यासह 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. या फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग देखील उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo