Realme ने आपला नवीन स्मार्टफोन Realme GT Neo 3 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, 50-मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंग यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनचा रियर डिझाईन एखाद्या रेसिंग ट्रॅकने प्रेरित दिसते. विशेष बाब म्हणजे हा फोन पहिल्या सेलमध्ये जवळपास 5,000 रुपयांच्या कमी किमतीत खरेदी करता येईल. मात्र, ही ऑफर फक्त सुरुवातीच्या युनिटवरच लागू होईल. चला तर जाणून घेऊयात स्मार्टफोनबाबत अधिक माहिती…
हे सुद्धा वाचा : कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' ठरला ब्लॉकबस्टर, आतापर्यंत झाले कोट्यवधींचे कलेक्शन
सध्या Realme GT Neo 3 स्मार्टफोन मलेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याची किंमत RM 2099 म्हणजेच जवळपास 36,800 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, विशेष ऑफर म्हणून हा फोन सुरुवातीला RM 1799 म्हणजेच सुमारे 31,500 रुपयांमध्ये विकला जाईल. अशा प्रकारे तुम्हाला सुमारे 5000 रुपये नफा मिळणार आहे. तसेच हा फोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे.
Realme GT Neo 3 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले फुल HD + रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच, हा डिस्प्ले HDR10+ सर्टिफिकेशनसह येतो. फोनमध्ये 8 GB RAM सह 256 GB इंटर्नल स्टोरेज आहे. यासोबत MediaTek Dimensity 8100 5G प्रोसेसर उपलब्ध आहे. त्याबरोबरच, यामध्ये उत्तम गेमिंग एक्सपेरियन्ससाठी कूलिंग सिस्टम देखील आहे, जेणेकरून फोन गरम होणार नाही.
फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड लेन्स, 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 80W सुपरडार्ट चार्जिंगला सपोर्ट करते.