Realme ने भारतात लाँच केला फास्ट चार्जिंगआणि मजबूत प्रोसेसर असलेला फ्लॅगशिप फोन, जाणून घ्या किंमत

Realme ने भारतात लाँच केला फास्ट चार्जिंगआणि मजबूत प्रोसेसर असलेला फ्लॅगशिप फोन, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

Realme GT NEO 3 फास्ट चार्जिंग स्मार्टफोन लाँच

फोनची पहिली विक्री 13 जुलै 2022 पासून सुरू होईल

फोन 7 जुलैपासून दुपारी 12 वाजता realme.com वरून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध

मोस्ट ट्रस्टेड टेक्नॉलॉजी ब्रँड Realme ने त्यांचे Realme GT Neo 3 150W Thor: Love and Thunder Limited Edition लाँच केले आहे. हा फोन सादर करण्याचा उद्देश भारतातील realme आणि marvel चाहत्यांना स्पीड आणि पॉवरचा सर्वोत्तम एक्सपेरियन्स होय. GT Neo 3 150W जगातील सर्वात जलद चार्जिंग फ्लॅगशिप आहे. चला तर जाणून घेऊया या आकर्षक फोनची किंमत आणि फीचर्स… 

हे सुद्धा वाचा : Koffee With Karan 7 : पैशांमुळे रणबीर कपूरचा शोमध्ये येण्यास नकार ? बघा करणला काय म्हणाला रणबीर…

Realme GT NEO 3 150W Thor Love and Thunder Limited Edition ची किंमत

Realme चा हा स्पेशल एडिशन फोन त्याच स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच केला जाईल. त्याचा 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट नायट्रो ब्लू कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. या फोनची किंमत 42,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनची पहिली विक्री 13 जुलै 2022 पासून सुरू होईल. वापरकर्ते हा फोन 7 जुलै दुपारी 12 वाजता realme.com वरून प्री-ऑर्डर करू शकतात.

realme gt neo 3

Realme GT NEO 3 150W Thor Love and Thunder Limited Edition: फीचर्स

Realme GT Neo 3 हा realme चा सर्वात फास्ट फोन आहे, 150W चार्जिंगसह जगातील सर्वात वेगवान फ्लॅगशिप फोन आहे. यात भारतातील पहिला डायमेंशन 8100 5G प्रोसेसर आहे. फोन सोनी IMX766 फ्लॅगशिप सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो.

फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच,  एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर त्याच्यासोबत उपलब्ध आहे. मागे 50MP मेन कॅमेरा असेल, जो OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो. फोनला 8MP अल्ट्रा वाईड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा मिळेल. या स्पेशल एडिशनमध्ये 4,500mAh बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo