REALMEचा नवीन 5G फोन लाँच, 5000mAh बॅटरीसह मिळेल 6.5 इंच डिस्प्ले
कंपनीचा Realme V20 5G नवीन स्मार्टफोन लाँच
5000mAh बॅटरीसह 6.5 इंच लांबीचा डिस्प्ले उपलब्ध
स्मार्टफोनची किंमत सुमारे 11,600 रुपये
Realme आपल्या 5G फोनचा पोर्टफोलिओ वेगाने विस्तारत आहे. अलीकडे, ब्रँडने चीनमध्ये Realme V20 5G ची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन ऑफलाइन बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल, ज्यामुळे तो ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध नाही. मे मध्ये, मॉडेल नंबर RMX3610 सह Realme फोन 3C आणि TENAA या चिनी सर्टिफिकेशन साइटवर दिसला. त्यावेळी, असा अंदाज लावला जात होता की, हे डिवाइस Realme V21 5G असू शकते. मात्र, हे डिवाइस आता "Realme V20 5G" मॉनिकरसह चीनमधील ऑफलाइन बाजारपेठेत आले आहे. चला तर जाणून घेऊयात डिव्हाइसचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबद्दल सर्व माहिती…
Realme V20 5G ची किंमत
V-सिरीजचे रियलमी फोन चीनबाहेर विकले जात नाहीत. जरी ते जागतिक बाजारपेठेत आले तरी, ते C-सिरीज डिव्हाइस म्हणून रीब्रॅंड केले जाण्याची शक्यता आहे. V20 5G ची किंमत 999 युआन (~$149) म्हणजेच सुमारे 11,600 रुपये आहे. हा फोन स्टार ब्लू आणि इंक क्लाउड ब्लॅक या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा : 56 दिवसांच्या वैधतेसह अवघ्या 3 रुपयांत मिळेल 1GB डेटा, Jio-Airtel सुद्धा या प्लॅनपुढे फेल
Realme V20 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme V20 5G मध्ये टीयरड्रॉप नॉचसह 6.5-इंच लांबीची LCD स्क्रीन आहे. यमध्ये 720×1600 पिक्सेलचे HD+ रिझोल्यूशन मिळेल. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 5-मेगापिक्सेल कॅमेरा दिला गेला आहे. त्याच्या मागील बाजूस असलेल्या ड्युअल-कॅमेरा युनिटमध्ये 13-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 0.3-मेगापिक्सेल सेकंडरी लेन्स आहे.
याव्यतिरिक्त, स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 चिपसेटसह सुसज्ज आहे. Realme V20 5Gमध्ये 4 GB रॅम आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोन Android 12 OS वर चालतो, की जुन्या Android 11 OS वर चालतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डिव्हाइसमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील नाही.
फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. हे डिवाइस 3.5 मिमी ऑडिओ जॅकने सुसज्ज आहे. डिव्हाइसची जाडी 8.1 मिमी आहे आणि त्याचे वजन सुमारे 184 ग्रॅम आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile