Realme ने या आठवड्याच्या सुरुवातीला Realme Narzo N65 5G फोन भारतात लाँच केला. त्यानंतर, आज म्हणजेच 31 मे 2024 रोजी Realme Narzo N65 5G स्मार्टफोनची पहिली विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वर दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाली आहे. Realme Narzo N65 5G पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला उत्तम ऑफर्ससह खरेदी करता येईल. जाणून घेऊयात Realme Narzo N65 5G फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
Realme Narzo N65 5G भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. Realme Narzo N65 5G फोन 4GB + 128GB आणि 6GB + 128GB स्टोरेज मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 11,499 रुपये आणि 12,499 रुपये आहे.
पहिल्या सेलदरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनवर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. हँडसेटवर नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत.
Realme Narzo N65 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देखील उपलब्ध आहे. तसेच, हा हँडसेट डस्ट आणि वॉटर प्रूफ आहे, ज्यासाठी फोनला IP54 ची रेटिंग देखील मिळाली आहे. चांगल्या कामगिरीसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट उपलब्ध आहे.
स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6GB पर्यंत RAM, व्हर्च्युअल रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे, जे 2TB पर्यंत वाढवता येईल. Realme ने Narzo N65 5G मध्ये फोटोग्राफीसाठी मागील बाजूस 50MP AI कॅमेरा प्रदान केला आहे, तर सेल्फीसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये पोर्ट्रेट आणि नाईट मोडसारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत.
पॉवरसाठी यात 5000mAh बॅटरी मिळेल, जी 15W चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सिमलेस कनेक्टिव्हिटीसाठी हँडसेटमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट मिळेल.