Realme Narzo N63 फोन भारतात 50MP कॅमेरासह लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News

Updated on 06-Jun-2024
HIGHLIGHTS

लेटेस्ट स्मार्टफोन Realme Narzo N63 अखेर भारतात लाँच

Realme Narzo N63 कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे.

Realme Narzo N63 फोनवर 500 रुपयांचे डिस्काउंट कूपन दिले जात आहे.

Realme चा लेटेस्ट स्मार्टफोन Realme Narzo N63 भारतात लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. कंपनीने नुकतेच भारतीय बाजारात Realme GT 6 स्मार्टफोन लाँच केला आहे. Narzo च्या या फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा डिस्प्ले, UniSoC T612 प्रोसेसर आणि अनेक पॉवरफुल फीचर्स मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Realme Narzo N63 ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: OnePlus च्या फोन्स, टॅब्स आणि स्मार्टवॉचेसवर मिळेल भारी Discount, कम्युनिटी सेलची घोषणा। Tech News

#Realme Narzo N63

Realme Narzo N63 ची भारतीय किंमत

Realme ने Realme Narzo N63 फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट 8,499 रुपये किमतीत सादर केला आहे. तर, फोनच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन Leather Blue आणि Twilight Purple कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 10 जूनपासून Amazon आणि Realme India वेबसाइटवर सुरू होईल. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 500 रुपयांचे डिस्काउंट कूपन दिले जात आहे. या फोनसह ग्राहक Realme Buds Wireless 2 Neo फक्त 899 रुपयांमध्ये खरेदी करू शकतील.

Realme Narzo N63 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नवीनतम Realme Narzo N63 स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन UniSoC T612 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4GB रॅम आणि 4GB डायनॅमिक रॅम आणि 64GB आणि 128GB स्टोरेज ऑप्शन्स उपलब्ध आहेत. वॉटर प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये IP54 रेटिंग देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी या Realme फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासह LED फ्लॅशदेखील फोनमध्ये उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. पॉवरसाठी, या फोनची बॅटरी 5000mAh ची आहे, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह आहे. सुरक्षिततेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :