Realme ने नुकतेच आपला लेटेस्ट हँडसेट Realme Narzo N63 भारतीय बाजारात सादर केला आहे. अखेर या फोनची पहिली विक्री आज म्हणजेच 10 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर लाइव्ह झाली आहे. पहिल्या सेलदरम्यान, बँक डिस्काउंटपासून स्वस्त EMI पर्यंत सर्व ऑफर्स फोनसह दिले जातील. जाणून घेऊयात Realme Narzo N63 ची किंमत आणि पहिली सेलमधील ऑफर्स-
Realme Narzo N63 बाजारात दोन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे, 4GB + 64GB आणि 4GB + 128GB स्टोरेज पर्याय. त्याच्या पहिल्या वेरिएंटची किंमत 8,499 रुपये आहे, तर दुसरे म्हणजे टॉप मॉडेल 8,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर तुम्हाला 500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, हँडसेटवर तुम्हाला स्वस्त EMI आणि एक्सचेंज ऑफरदेखील मिळणार आहे.
Realme Narzo N63 फोनमध्ये LCD डिस्प्ले मिळेल, ज्याचा आकार 6.74 इंच लांबीचा आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये या स्मार्टफोनमध्ये UniSoC T612 चिप आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 4GB रॅम, डायनॅमिक रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. सुरक्षिततेसाठी हँडसेटमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.
फोटग्राफीसाठी, Realme Narzo N63 फोनमध्ये LED फ्लॅश लाइटसह 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या समोर स्लेफी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी एक 8MP कॅमेरा देखील उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येईल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ब्लूटूथ, Wi-Fi, GPS, ड्युअल सिम स्लॉट आणि कनेक्टिव्हिटीसाठी USB टाइप-C पोर्ट आहे.