Realme चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कंपनीने आज भारतीय बाजारपेठेत एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने हा मोबाईल फोन लोकप्रिय ‘Narzo’ सीरीजमध्ये समाविष्ट केला आहे, जो Realme Narzo N61 नावाने लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फोन ArmorShell संरक्षणासह सुसज्ज आहे. जाणून घेऊयात Realme Narzo N61 किंमत, फीचर्स आणि संपूर्ण तपशील-
Also Read: बहुप्रतीक्षित Oppo K12x 5G भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स
Realme Narzo N61 दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. मोबाइलच्या बेस मॉडेलमध्ये 4GB रॅमसह 64GB स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच, टॉप व्हेरिएंट 6GB रॅमसह 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही फोन्सची किंमत अनुक्रमे 7,499 आणि 8,499 रुपये इतकी आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सुरुवातीच्या सेलमध्ये कंपनी या फोनवर 500 रुपयांची सूट देईल. त्यानंतर, या फोनची किंमत अनुक्रमे 6,999 रुपये आणि 7,999 रुपये असेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा Narzo N61 फोन 6 ऑगस्टपासून व्हॉयेज ब्लू आणि मार्बल ब्लॅक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध असेल.
Realme Narzo N61 मध्ये 6.74 इंच लांबीचा HD + वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन देण्यात आली आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रक्रियेसाठी, या मोबाइलमध्ये 1.8 GHz क्लॉक स्पीडवर चालणारा UNISOC T612 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6GB डायनॅमिक रॅम तंत्रज्ञान आहे, जे फिजिकल रॅमसह एकूण 12GB पर्यंत रॅम पॉवर देईल. त्याबरोबरच, हा Realme स्मार्टफोन 2TB मेमरी कार्डला सपोर्ट करेल.
फोटोग्राफीसाठी, Realme Narzo N61 मध्ये 32MP सुपर क्लियर कॅमेरा आहे. मागील पॅनलवर उपस्थित असलेला हा सेन्सर F/1.8 अपर्चरवर काम करतो. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, हा फोन 5000 mAh बॅटरीला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये USB टाइप C पोर्ट आणि 10W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान आहे.