प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चा आगामी Realme Narzo N61 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु आहे. अखेर कंपनीने आपल्या आगामी स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा नवीन बजेट फोन आहे. कंपनीने या फोनची लॉन्च तारीख आणि फोनच्या अधिकृत डिझाइनचे अनावरण केले आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, काही काळापूर्वी कंपनीने Realme 13 Pro 5G सीरीजची भारतीय लाँच डेट जाहीर करण्यात आली होती. हे फोन भारतात 30 जुलै रोजी लाँच होणार आहेत. मात्र, Narzo फोन एक दिवस आधी सादर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme Narzo N61 चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
Realme ने Realme Narzo N61 फोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म केली आहे. हा फोन भारतात 29 जुलै रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. कंपनीने या फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट देखील Realme च्या अधिकृत साइट आणि Amazon वर लाईव्ह करण्यात आली आहे. या साईटच्या माध्यमातून फोनचा अधिकृत लूक आणि काही प्रमुख फीचर्स समोर आले आहेत.
मायक्रोसाईटनुसार, अनेक विशेष फीचर्स या स्मार्टफोनमध्ये समाविष्ट असतील. हा फोन TUV Rhineland High-Reliability certified आहे, जो याला मजबूत बिल्ड प्रदान करतो, असा कंपनीचा दावा आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये आर्मरशेल प्रोटेक्शन देण्यात आले आहे, ज्यामुळे हा फोन खराब वातावरणातही उत्तम प्रकारे काम करतो.
त्याबरोबरच, या फोनला पाणी आणि धुळीपासून प्रोटेक्शनसाठी IP54 रेटिंग देण्यात आली आहे. या फोनमध्ये रेनवॉटर स्मार्ट टच टेक्नॉलॉजी देखील दिले जाईल. ज्याद्वारे तुम्ही पावसाचे थेंब आणि ओल्या हातांनी फोन वापरता येईल.
Realme ने शेअर केलेल्या टीझर पोस्टरमध्ये अशी माहिती मिळाली की, Realme NARZO N61 फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 32MP प्रायमरी कॅमेरा असेल. हा कंपनीचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन असेल. Realme Narzo N61 स्मार्टफोन कंपनी 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.