Realme Narzo N55 भारतात लाँच, किमंत अगदी तुमच्या बजेटमध्ये

Realme Narzo N55 भारतात लाँच, किमंत अगदी तुमच्या बजेटमध्ये
HIGHLIGHTS

Realme Narzo N55 स्मार्टफोन भारतात लाँच

या फोनच्या डिस्प्लेमध्ये Mini कॅप्सूल फिचर दिले गेले आहे.

फोनमध्ये 64MP AI कॅमेरा उपलब्ध आहे.

Realme Narzo N55 स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये भारतात लाँच झाला आहे. हा नवा फोन कंपनीच्या NARZO सिरीजचा नेक्स्ट जनरेशन मॉडेल आहे. हा फोन ग्राहकांसाठी बजेट किमतीत लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनच्या डिस्प्लेमध्ये Mini कॅप्सूल फिचर दिले गेले आहे, चाल तर मग जाणून घेऊयात किंमत आणि जबरदस्त फीचर्स- 

Realme Narzo N55

Realmeचा हा नवीन फोन 6.72 इंच लांबीच्या FHD+IPS LCD डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोन octa-core MediaTek Helio G88 प्रोसेसरसह मिळेल. फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल. जी 1TB पर्यंत वाढवता येईल, पण त्यासाठी तुम्हाला मायक्रो SD कार्डची गरज आहे. सेल्फी कॅमेरासाठी फोनमध्ये पंच हॉल कटआऊट दिला गेला आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये Mini कॅप्सूल दिली गेली आहे, ज्यामध्ये नोटिफिकेशन बघता येईल. 

कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64MP AI कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यासोबत 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यासाठी आत USB टाईप C पोर्ट आहे. 

किंमत : 

Realme Narzo N55च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. हा फोन रिअलमी च्या अधिकृत साईट आणि Amazon इंडियावरून 13 एप्रिल दुपारी 12 वाजतापासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo