Realme ने मागील आठवड्यात Realme Narzo N53 स्मार्टफोन लाँच केला. हा स्मार्टफोन कंपनीने बजेट विभागात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनची नियमित विक्री 24 मे 2023 पासून सुरू होणार आहे. मात्र, आज 22 मे 2023 रोजी या स्मार्टफोनची स्पेशल सेल आहे. ही सेल आज दुपारी 2 वाजतापासून ते 4 वाजेपर्यंत लाईव्ह असणार आहे. या दोन तासांच्या स्पेशल सेलदरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.
https://twitter.com/realmenarzoIN/status/1660514135300272129?ref_src=twsrc%5Etfw
Amazon वर ही सेल सुरु असणार आहे, फोनवर 1000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. मात्र, ही ऑफर फक्त HDFC बँक कार्ड पेमेंटवर दिली जाईल. Realme च्या वेबसाइटवर ICICI आणि HDFC बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर बेस व्हेरिएंटवर 750 रुपये आणि टॉप व्हेरिएंटवर 1000 रुपयांची सवलत मिळणार आहे. फोन फेदर गोल्ड आणि फेदर ब्लॅक या दोन कलर पर्यायांमध्ये येतो.
Realme Narzo N53 बेस व्हेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजने सुसज्ज आहे. ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. तर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह टॉप व्हेरिएंट 10,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Realme Narzo N53 मध्ये 6.74 इंच फुल HD+ LCD IPS डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz आहे. फोनमध्ये Unisoc T612 4G प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 5000mAh बॅटरी आहे, जी 33W USB टाइप C फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP मुख्य कॅमेरा आणि मागील बाजूस AI लेन्स उपलब्ध आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 8MP कॅमेरासह सुसज्ज आहे. हे Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर कार्य करेल.