गेल्या काही दिवसांपासून Realme च्या Narzo सीरिजच्या नव्या फोनची चर्चा सुरु होती. अखेर आता Realme Narzo N53 स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा फोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. या सीरीजचा नवीन फोन Realme Narzo N53 हा कंपनीचा सर्वात पातळ फोन आहे, ज्याची जाडी 7.49mm आहे. या स्मार्टफोनचा रियर कॅमेरा मॉड्यूल iPhone 14 Pro Max सारखा दिसतो.
Realme N53 च्या 4GB RAM + 64GB बेस व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे आणि 6GB RAM + 128GB टॉप व्हेरिएंट 10,999 रुपये आहे. या फोनची स्पेशल सेल 22 मे रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत ई-कॉमर्स वेबसाइट Amazon आणि Realme च्या अधिकृत स्टोअरवर होणार आहे.
फोनची रेगूलर सेल 24 मे रोजी दुपारी 12 वाजतापासून सुरु होणार आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटच्या खरेदीवर 500 रुपयांची सूट मिळेल. तर, टॉप व्हेरियंटवर 1,000 रुपयांची सूट मिळेल.
या नवीनतम Realme फोनमध्ये 6.74-इंच लांबीचा FHD + LCD IPS डिस्प्ले उपलब्ध आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनच्या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइन देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये Unisoc T612 4G प्रोसेसर आहे.
फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजसाठी सपोर्ट आहे. फोनमध्ये 6GB वर्च्युअल रॅम एक्सपेंशन फीचर देखील मिळतो. यासह फोनची स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येईल. Realme Narzo N53 मध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W USB टाइप C फास्ट चार्जिंग फीचर मिळेल.
फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये 50MP प्रायमरी AI कॅमेरा मिळेल. तसेच, सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार आहे.