Realme आणतोय Narzo सिरीजमधील सर्वात थिन फोन, व्हॅल्यू फॉर मनी डिव्हाइस

Updated on 15-May-2023
HIGHLIGHTS

कंपनी 18 मे रोजी भारतात Narzo सीरीजचा सर्वात पातळ स्मार्टफोन लाँच करणार

ब्रँडने Realme Narzo N53 ला अधिकृतपणे टीज केले आहे.

कंपनी 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत हा फोन लाँच करू शकते.

Realme लवकरच एक नवीन बजेट रेंज स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी 18 मे रोजी भारतात Narzo सीरीजचा सर्वात पातळ स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. ब्रँडने Realme Narzo N53 ला अधिकृतपणे टीज केले आहे. या फोनच्या केवळ डिझाईनचा खुलासा झाला आहे. ब्रँडने या स्मार्टफोनचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये फोनचा गोल्डन कलर व्हेरिएंट दाखवण्यात आला आहे.

किती असेल किंमत ?

Realme Narzo N53 मध्ये कमी बजेटमध्ये चांगली कॅमेरा कॉलिटी देण्यात कंपनीचा फोकस असेल, असे म्हटले जात आहे. कंपनीच्या मते, हे व्हॅल्यू फॉर मनी डिव्हाइस असेल. म्हणजेच कंपनी 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत हा फोन लाँच करू शकते. या फोनची विक्री Amazon वरून होणार आहे. 

Realme Narzo N53 चे संभावित फीचर्स

टिपस्टर्सनुसार, फोन 6GB पर्यंत रॅम व्हेरिएंटसह लाँच केला जाऊ शकतो. यासोबतच व्हर्च्युअल रॅमचा पर्यायही उपलब्ध असेल. हँडसेट 33W चार्जिंग सपोर्टसह येईल. कंपनी रिटेल बॉक्समध्ये फोनसोबत चार्जर देखील देण्याची शक्यता आहे. 

मागील कॅमेरा मॉड्यूलमध्ये तीन कट-आउट आहेत, ज्यामध्ये दोन कॅमेरे आणि एक LED फ्लॅश लाइट असेल.  व्हॉल्यूम आणि पॉवर दोन्ही बटन्स फोनच्या उजव्या बाजूला मिळतील. पावर बटनवर कंपनी फिंगरप्रिंट सेन्सर देणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :