Realme ने गेल्या वर्षी आपल्या Narzo सीरीज अंतर्गत N53 स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर, आता कंपनीने या हँडसेटची किंमत कमी केली आहे. या कपातीनंतर तुम्ही हा बजेट फोन स्वस्तात खरेदी करू शकता. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर ऑफलाइन मार्केटमधून हा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करता येईल. चला तर मग जाणून घेऊयात, या Realme Narzo N53 ची नवीन किंमत आणि संपूर्ण फीचर्सबद्दल सविस्तर माहिती-
Realme ने फक्त Realme Narzo N53 च्या बेस व्हेरिएंटच्या किमतीत कपात केली आहे. डिव्हाइसचा 4GB RAM + 64GB स्टोरेज पूर्वी 8,299 रुपयांना खरेदी केला जात होता. पण, आता कंपनीने या हँडसेटची किंमत 800 रुपयांनी कमी केली आहे. या कपातीनंतर हा फोन 7,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या साइटवर हा फोन 8,999 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय, कंपनीच्या साइटवर डिव्हाइसचा 6GB + 128GB वेरिएंट 10,999 रुपये आणि 8GB + 128GB वेरिएंट 11,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे.
Realme Narzo N53 मध्ये 6.74 इंच लांबीचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. उत्तम कामगिरीसाठी हा स्मार्टफोन Android 13 आधारित OneUI वर सादर करण्यात आला आहे, जो Unisoc T612 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतो. हा मोबाइल 6GB व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये सुरक्षेसाठी साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर एम्बेडेड पॉवर बटण आहे. तर, हा मोबाइल फोन फेस अनलॉक फीचर्ससह सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागील पॅनलवर 50MP चा प्राथमिक सेन्सर प्रदान केला आहे. त्याबरोरबच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, हा फोन F/2.0 अपर्चरसह 8MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी, 33W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.