Realme Narzo 80 सिरीज स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट Confirm! जाणून घ्या अपेक्षित किंमत, फीचर्स उघड

Updated on 01-Apr-2025
HIGHLIGHTS

Realme च्या आगामी Realme Narzo 80 सिरीजची लाँच डेट कन्फर्म

या सिरीजअंतर्गत Realme Narzo 80 Pro आणि Realme Narzo 80x फोन समाविष्ट

हे दोन्ही फोन येत्या 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच होणार आहेत.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme च्या आगामी Realme Narzo 80 सिरीजच्या भारतीय लाँचची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अखेर कंपनीने आगामी स्मार्टफोन्सची तारीख निश्चित झाली आहे. कंपनी या सिरीजअंतर्गत Realme Narzo 80 Pro आणि Realme Narzo 80x असे दोन फोन सादर करणार आहे. या दोन्ही फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Amazon वर लाईव्ह झाली आहे. मायक्रोसाईटद्वारे लाँच होण्यापूर्वी फोनच्या अनेक फीचर्सची पुष्टी करण्यात आली आहे. जाणून घेऊयात Realme Narzo 80 सिरीजचे लॉन्चिंग डिटेल्स आणि सर्व माहिती-

Also Read: OnePlus 13T लाँच अखेर Confirm! ‘या’ महिन्यात कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोन होणार बाजारात दाखल

Realme Narzo 80 सिरीजची भारतीय लाँच डेट

Realme ने Realme Narzo India च्या अधिकृत X हँडलवर Realme Narzo 80 Pro आणि Realme Narzo 80x फोनच्या भारतात लाँच डेटची पुष्टी केली आहे. हे दोन्ही फोन येत्या 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच होणार आहेत. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री Amazon वरून होईल. एवढेच नाही तर, Amazon द्वारे फोनच्या अनेक फीचर्सची पुष्टी देखील करण्यात आली आहे. Realme Narzo 80 Pro 5G फोनबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी तो 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करेल. दुसरीकडे, Realme Narzo 80x 5G फोन 13,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला जाईल.

Realme Narzo 80 सिरीज

Amazon लिस्टिंगद्वारे Realme Narzo 80 सिरीजचे अनेक फीचर्स आणि स्पेक्स पुढे आले आहेत. Realme Narzo 80 Pro 5G फोनच्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Mediatek Dimensity 7400 5G प्रोसेसरने सुसज्ज असेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी असेल, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

दुसरीकडे, Realme Narzo 80x 5G विद्यार्थ्यांमध्ये हा सर्वोत्तम गेमिंग फोन असणार आहे, असे म्हटले जात आहे. फोनच्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 5G प्रोसेसर असेल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :