Realme ने Realme Narzo 70x 5G चा नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे.
Realme Narzo 70x 5G वर कंपनी 8GB RAM वर 2,000 रुपयांची सूट ऑफर करत आहे.
Realme Narzo 70x 5G फोनमध्ये रेन वॉटर टच फिचर आणि एअर जेश्चर फिचर उपलब्ध
Realme Narzo 70x 5G: Realme ने अलीकडेच म्हणजेच एप्रिल महिन्यात आपला लेटेस्ट Realme Narzo 70x स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन कंपनीने 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीच्या पॉवरसह सादर केला आहे. Realme Narzo 70x 5G फोन त्यांच्या लोकप्रिय ‘Narzo’ सीरीज अंतर्गत येतो. दरम्यान, आता या 5G फोनला आणखी शक्तिशाली बनवत कंपनीने त्याचे 8GB रॅम मॉडेलही भारतात लाँच केले आहे. जाणून घेउयात या नव्या फोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
Realme Narzo 70X 5G फोन तीन रॅम व्हेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात 4GB रॅम, 6GB रॅम आणि आता 8GB रॅम देखील आहे. हे तिन्ही मॉडेल 128GB स्टोरेजला सपोर्ट करतात. फोनच्या नव्या 8GB RAM व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या कंपनी 8GB RAM वर 2,000 रुपयांची सूट ऑफर करत आहे. त्यानंतर ते फक्त 12,999 मध्ये मिळू शकते. हा फोन आइस ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.
Realme Narzo 70x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme Narzo 70x 5G फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा HD + पंच होल डिस्प्ले आहे. ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, यात MediaTek Dimensity 6100+ octacore प्रोसेसर देण्यात आला आहे. मोबाइलमध्ये रेन वॉटर टच फिचर, एअर जेश्चर फिचर, डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर, पाणी आणि डस्ट प्रोटेक्शनसाठी IP54 रेटिंग देखील आहे.
फोटोग्राफीसाठी Realme Narzo 70x 5G ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2MP सेकंडरी लेन्स मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा मिळेल. डिव्हाइसमध्ये मोठी 5000mAh बॅटरी आहे. क्विक चार्जिंगसाठी यात 45W SuperVOOC चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे. हा फोन केवळ 31 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होईल, असा कंपनीचा दावा आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.