प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी नवा Realme Narzo 70 Turbo 5G फोन भारतात लाँच केला होता. हा स्मार्टफोन कंपनीने 20000 रुपयांअंतर्गत सादर केला होता. Realme चा हा 5G स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये भारतीय बाजरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, गेमिंगसाठी हा बजेट किमतीत सर्वोत्तम फोन आहे, असे म्हटले जाते. तुम्हाला देखील हा फोन खरेदी करायचा असेल तर, हीच योग्य वेळ आहे. कारण Amazon वर हा स्मार्टफोन सध्या सवलत आणि ऑफर्ससह उपलब्ध आहेत.
Also Read: Lenovo टॅबलेट्सवर मिळतोय मोठ्या प्रमाणात Discount! किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी, पहा यादी
Realme च्या नवीनतम Realme Narzo 70 Turbo 5G स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपयांपासून सुरू होते. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 20,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला Amazon वरून हा Realme स्मार्टफोन खरेदी केल्यावर 1000 रुपयांची कूपन सूट मिळत आहे. आता ते 824 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करता येईल. तसेच, या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
Realme Narzo 70 Turbo 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Dimensity 7300 Energy 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 14 वर आधारित realme UI 5.0 वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनचा बेस व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो.
याव्यतिरिक्त, Realme च्या या हँडसेटला 50MP AI कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, फोटो, व्हिडिओ, नाईट, पोर्ट्रेट, स्ट्रीट मोड, स्लो मोशन आणि ड्युअल व्ह्यू मोड आणि गुगल लेन्स सारख्या फीचर्सने सुसज्ज लेन्स मागील बाजूस उपलब्ध आहेत. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. यासह फोटो, व्हिडिओ, पोर्ट्रेट, नाईट कॅमेरा फीचर्स देखील उपलब्ध आहेत. पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. चार्जिंगसाठी यात USB टाइप-C पोर्ट देखील आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.