नवा Realme Narzo 70 Turbo 5G भारतात लाँच! बजेट किमतीत मिळतील सर्वात जबरदस्त फीचर्स, पहा किंमत

Updated on 09-Sep-2024
HIGHLIGHTS

Realme Narzo 70 Turbo 5G भारतीय बाजारात अखेर लाँच

दिवाळी ऑफर अंतर्गत, Realme Narzo 70 Turbo 5G फोन 16,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच

पहिल्या सेलमध्ये या फोनवर 2000 रुपयांचे कूपन डिस्काउंट मिळेल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्मता Realme चा नवा स्मार्टफोन Realme Narzo 70 Turbo 5G भारतीय बाजारात अखेर लाँच झाला आहे. या फोनच्या लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनसोबत कंपनी Realme Buds N1 TWS देखील लाँच करणार आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये व्हेपर कुलिंग सिस्टिमही उपलब्ध आहे. हा फोन बजेट विभागात सादर करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme Narzo 70 Turbo 5G ची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Motorola Razr 50 Launch: नवा फोल्डेबल स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, पहा किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 70 Turbo 5G ची भारतीय किंमत

नवा Realme Narzo 70 Turbo 5G फोन 6GB रॅमसह 128GB स्टोरेज आणि 8GB रॅमसह 128GB व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. तर, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह टॉप व्हेरिएंट उपलब्ध आहे. दिवाळी ऑफर अंतर्गत, Realme Narzo 70 Turbo 5G फोन 16,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. तर, दुसरा व्हेरिएंट 17,999 रुपये आणि टॉप व्हेरिएंट 20,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असेल. हा फोन टर्बो पर्पल, टर्बो ग्रीन आणि टर्बो यलो या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आणण्यात आला आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Realme Narzo 70 Turbo 5G स्मार्टफोनची विक्री Amazon वर 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. पहिल्या सेलमध्ये या फोनवर 2000 रुपयांचे कूपन डिस्काउंट मिळेल.

Realme Narzo 70 Turbo 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 70 Turbo 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच लांबीचा Samsung E4 OLED डिस्प्ले आहे. या नव्या मोबाइलमध्ये कंपनीने मजबूत कामगिरीसाठी MediaTek Dimension 7300 Energy चिपसेट दिला आहे. कंपनीने मोबाईलमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे.

फोटोग्राफीसाठी, हा फोन ड्युअल रीअर कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP चा प्राथमिक कॅमेरा F1.8 अपर्चरसह येतो. तर, 2 मेगापिक्सेल f/2.4 अपर्चर लेन्सचा सपोर्ट मिळतो. याव्यतिरिक्त, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, वापरकर्त्यांना F2.4 अपर्चरसह 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की याला 10 मिनिट चार्ज करून तुम्हाला 1.7 तास गेम खेळता येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :