लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Realme Narzo 70 Turbo 5G ची भारतात पहिली Sale आज! मिळतील सुपर ऑफर्स

लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Realme Narzo 70 Turbo 5G ची भारतात पहिली Sale आज! मिळतील सुपर ऑफर्स
HIGHLIGHTS

नव्या Realme Narzo 70 Turbo 5G फोनची पहिली विक्री भारतात आजपासून होणार सुरु

Realme Narzo 70 Turbo 5G स्मार्टफोनवर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे.

फोन गरम होऊ नये म्हणून यात VC कॉलिंग सिस्टम देखील आहे.

लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच भारतात आपला नवा स्मार्टफोन Realme Narzo 70 Turbo 5G लाँच केला होता. त्यानंतर, या स्मार्टफोनची पहिली सेल आज म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध इ- कॉमर्स साईट Amazon India वर सुरू होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन बजेट विभागात सादर करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात नव्या Realme Narzo 70 Turbo 5G ची किंमत आणि त्यावर उपलब्ध असलेले सर्व ऑफर्स-

Realme Narzo 70 Turbo 5G ची भारतीय किंमत

Realme-Narzo-70-Turbo-1.jpg

नवीनतम Realme Narzo 70 Turbo च्या 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. तर, त्याचे 8GB+128GB आणि 12GB+256GB स्टोरेज मॉडेल्स अनुक्रमे 17,999 रुपये आणि 20,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. पहिल्या सेलदरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या 5G स्मार्टफोनवर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच, हँडसेटवर परवडणारी EMI आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध असतील. जर तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंजसाठी असेल तर, तुम्ही या ऑफरचा लाभ नक्की घ्यावा.

Realme Narzo 70 Turbo 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

नविनतम Realme Narzo 70 Turbo 5G स्मार्टफोनमध्ये चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Realme चा हा नवीन स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरने सुसज्ज करण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळणार आहे. तसेच, फोन गरम होऊ नये म्हणून यात VC कॉलिंग सिस्टम देखील आहे.

Realme-Narzo-70-Turbo-Design

फोटोग्राफीसाठी, Realme Narzo 70 Turbo 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी आणि 2MP पोर्ट्रेट सेन्सर आहे. आकर्षक मोबाइल फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे. या फोनमध्ये 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 1.7 तास गेम खेळता येईल, असा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट सारखे स्पेसिफिकेशन दिले गेले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo