Realme Narzo 70 Turbo 5G फोनवर होतोय ऑफर्सचा मोठ्या प्रमाणात वर्षाव! भारी Earbuds देखील Free

Realme Narzo 70 Turbo 5G फोनवर होतोय ऑफर्सचा मोठ्या प्रमाणात वर्षाव! भारी Earbuds देखील Free
HIGHLIGHTS

गेल्या महिन्यात भारतात Realme Narzo 70 Turbo 5G फोन लाँच

Realme Narzo 70 Turbo 5G सह Earbuds देखील मोफत मिळणार

Realme Narzo 70 Turbo 5G फोन रेनवॉटर टच फीचरने सुसज्ज आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने नुकतेच म्हणजेच गेल्या महिन्यात भारतात Realme Narzo 70 Turbo 5G फोन लाँच केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, 12GB RAM आणि MediaTek Dimensity 7300 Energy च्या सामर्थ्याने सुसज्ज आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की, लाँचच्या एका महिन्याच्या आत मोठ्या सवलती आणि ऑफरसह विक्री सुरू झाली आहे. एवढेच नाही तर तुम्हाला Earbuds देखील मोफत मिळणार आहेत. जाणून घ्या सविस्तर-

Also Read: घाण,धुळीची चिंता नाही! सणासुदीच्या हंगामात Smart Air Purifiers मोठ्या सवतींसह उपलब्ध, पहा यादी

Realme Narzo 70 Turbo 5G

Realme Narzo 70 Turbo 5G ची किंमत आणि ऑफर्स

Realme Narzo 70 Turbo 5G फोन 8GB + 128GB आणि 12GB + 256GB व्हेरियंटवर 1,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. या सवलतीसह, फोनचा 8GB रॅम मॉडेल 16,999 रुपयांना आणि 12GB रॅम व्हेरिएंट 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर, या Realme फोनचा 6GB RAM + 128GB मेमरी व्हेरिएंटवर तुम्हाला 750 रुपयांची सूट मिळणार आहे.

ऑफर्सबद्दल सविस्तर बोलायचे झाल्यास, डिस्काउंट कूपन व्यतिरिक्त कंपनी फोन खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना 2,499 रुपयांचा Realme Buds N1 मोफत देत आहे. त्याबरोबरच, MobiKwik द्वारे पेमेंट केले असल्यास, ग्राहकांना 1,500 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. लक्षात घ्या की, या सर्व ऑफर realme.com च्या वेबसाइटवर LIVE आहेत.

Realme Narzo 70 Turbo 5G

Realme Narzo 70 Turbo 5G फोनमध्ये 6.67-इंच लांबीची Samsung E4 OLED स्क्रीन आहे जी 120Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट उपलब्ध आहे. उत्तम प्रक्रियेसाठी, MediaTek डायमेंसिटी 7300 एनर्जी ऑक्टाकोर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, वर सांगितल्याप्रमाणे हा फोन 6GB रॅम, 8GB रॅम आणि 12GB रॅममध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन डायनॅमिक रॅम टेक्नॉलॉजीसह सुसज्ज आहे. होय, फिजिकल रॅममध्ये 14GB व्हर्च्युअल रॅम मिळेल. हा फोन रेनवॉटर टच फीचरने सुसज्ज आहे, ज्यामुळे ओल्या हातानेही वापरता येतो.

Realme-Narzo-70-Turbo.jpg

फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर 50MP चा मुख्य सेन्सर प्रदान केला आहे, जो 2MP पोर्ट्रेट लेन्ससह कार्य करतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोन मोठ्या 5000 mAh बॅटरीसह येतो, जी 45W अल्ट्रा फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. फोन IP65 प्रमाणित आहे ज्यामुळे तो वॉटर आणि डस्टप्रूफ बनतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo