Realme Narzo 70 Pro 5G सेल आज होणार सुरु, 2000 रुपयांच्या सवलतीसह मोफत इयरबड्स मिळतील Free। Tech News 

Realme Narzo 70 Pro 5G सेल आज होणार सुरु, 2000 रुपयांच्या सवलतीसह मोफत इयरबड्स मिळतील Free। Tech News 
HIGHLIGHTS

Realme Narzo 70 Pro 5G विक्री आज म्हणजेच 22 मार्च 2024 पासून सुरू होईल.

HDFC आणि ICICI बँक कार्डवर 2000 रुपयांपर्यंत सूट

या फोनसह Realme Buds T300 देखील मोफत दिले जाईल.

अलीकडेच Realme Narzo 70 Pro 5G स्मार्टफोन अनोख्या फीचर्ससह भारतात लाँच करण्यात आला होता. फोनची विक्री आज म्हणजेच 22 मार्च 2024 पासून सुरू होईल. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात लाँच झालेल्या या स्मार्टफोनची अर्ली बर्ड सेल लाँचच्या दिवसापासून सुरू झाली. मात्र, आज हा फोन प्रत्येकासाठी ई-कॉमर्स वेबसाइट आणि अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल. एवढेच नाही तर, पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर आणि गिफ्ट देखील मिळेल.

Realme Narzo 70 Pro 5G ची किंमत

Realme Narzo 70 Pro 5G ची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर आज दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. त्याआधी फोनच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन ग्लास ग्रीन आणि ग्लास गोल्ड या दोन कलर ऑप्शन्ससह येतो.

Realme NARZO 70 Pro 5G launched 2024
Realme NARZO 70 Pro 5G launched 2024

Realme Narzo 70 Pro 5G चे सेल ऑफर्स

Realme Narzo 70 Pro 5G च्या स्पेशल सेलमध्ये स्मार्टफोन खरेदीवर भरघोस सूट दिली जाणार आहे. सेलमध्ये तुम्हाला HDFC आणि ICICI बँक कार्डवर 2000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. होय, बेस व्हेरिएंटवर 1000 रुपये आणि टॉप व्हेरिएंटवर 2000 रुपयांची सूट आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. त्याबरोबरच, या फोनसह Realme Buds T300 देखील मोफत दिले जाईल. इतकेच नाही तर, Jio चे 10,000 रुपयांपर्यंतचे फायदे देखील मिळणार आहे.

Realme Narzo 70 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 70 Pro 5G Specification
Realme Narzo 70 Pro 5G Specification

Realme Narzo 70 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंच लांबीचा HD AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोन Dimensity 7050 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि मागील बाजूस 2MP मॅक्रो लेन्स आहे. त्याबरोबरच, पॉवरसाठी यात 67W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये USB टाइप-C पोर्ट देखील उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo