Realme Narzo 70 Pro 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! Early Bird सेल ऑफर्सची घोषणा, अप्रतिम बड्स मिळतील Free। Tech News 

 Realme Narzo 70 Pro 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! Early Bird सेल ऑफर्सची घोषणा, अप्रतिम बड्स मिळतील Free। Tech News 
HIGHLIGHTS

Realme Narzo 70 Pro 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँच तारखेची पुष्टी

Realme Narzo 70 Pro 5G फोन भारतात 19 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल.

अर्ली बर्ड सेलदरम्यान फोनच्या खरेदीवर 2,299 रुपये किमतीचे Realme Buds T300 मोफत

Realme Narzo 70 Pro 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँच तारखेची पुष्टी झाली आहे. यापूर्वी हा फोन भारतात मार्चमध्ये लॉन्च केला जाईल, असे कंपनीने सांगितले होते. त्यानंतर, आता या फोनच्या भारतीय लाँचची तारीख कंपनीने निश्चित झाली आहे. लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने फोनच्या Early Bird सेलची घोषणा देखील करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता ‘शाहिद कपूर’ला या प्रोडक्टसाठी आपला ब्रँड ॲम्बेसेडर बनवले आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme Narzo 70 Pro 5G च्या भारतीय लाँच आणि Early Bird सेल संबंधित सर्व तपशील-

हे सुद्धा वाचा: Motorola च्या Affordable 5G फोनच्या किमतीत हजारो रुपयांची कपात, आता अतिशय स्वस्तात खरेदी करा। Tech News

##Realme Narzo 70 Pro 5G camera
###Realme Narzo 70 Pro 5G camera

Realme Narzo 70 Pro 5G चे भारतीय लाँच

Realme Narzo 70 Pro 5G फोन भारतात 19 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. वर सांगितल्याप्रमाणे, लाँच झाल्यानंतर फोनची अर्ली बर्ड सेल देखील सुरू होईल. या सेलदरम्यान वापरकर्ते हजारो रुपयांची बचत करू शकतात. जाणून घेऊयात अर्ली बर्ड सेल अंतर्गत उपलब्ध असलेल्या फायद्यांचे तपशील-

Early Bird सेल बेनिफिट्स

या सेल दरम्यान ग्राहकांना Realme Narzo 70 Pro 5G फोनच्या खरेदीवर अनेक लाभ मिळतील. अर्ली बर्ड सेलदरम्यान, ग्राहकांना फोनच्या खरेदीवर 4,299 रुपयांची सूट मिळेल. यासह, फोनच्या खरेदीवर त्यांना 2,299 रुपये किमतीचे Realme Buds T300 देखील मोफत मिळतील. इतकेच नाही तर, वापरकर्ते 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI लाभ देखील घेऊ शकतात.

Realme Narzo 70 Pro 5G चे फीचर्स

Realme Narzo 70 Pro 5G फोनची डेडिकेटेड मायक्रोसाइट Amazon India आणि Realme India वर लाइव्ह झाली आहे. फोनचा अधिकृत लूक आणि काही मुख्य फीचर्सची माहिती या साइटद्वारे समोर आली आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये ड्युओ टच ग्लास बॅक पॅनल डिझाइन आहे. याशिवाय फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सारखे दोन व्हेरिएंट असतील.

त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात 50MP Sony IMX890 1/1.56 प्राइमरी कॅमेरा असेल, ज्यासोबत फोनमध्ये OIS सपोर्ट उपलब्ध असेल. लीकनुसार, फोन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट असू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo