Air Gesture आणि Rainwater Touch सारख्या Attractive फीचर्ससह Realme Narzo 70 Pro 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 

Air Gesture आणि Rainwater Touch सारख्या Attractive फीचर्ससह Realme Narzo 70 Pro 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

Realme Narzo 70 Pro 5G भारतीय बाजारपेठेत लाँच

फोनची अर्ली बर्ड सेल आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होईल.

Realme Narzo 70 Pro 5G मध्ये Air Gesture आणि Rainwater Touch नवीन फिचर मिळतील.

Realme ने आपल्या Narzo सिरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. होय, नवीन मोबाइल Realme Narzo 70 Pro 5G भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे युजर्सना यामध्ये एअर जेश्चर आणि रेनवॉटर टच फीचर यासारखे नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळेल. यासोबतच Sony IMX890 ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन टेक्नॉलॉजी असलेला कॅमेरा मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात लेटेस्ट Realme Narzo 70 Pro 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.

हे सुद्धा वाचा: Apple Days Sale: ‘या’ iPhone मॉडेल्सवर मिळणार मोठ्या प्रमाणात Discount, मिळतायेत Best ऑफर्स

realme narzo 70 pro 5g

Realme Narzo 70 Pro 5G ची किंमत

Realme Narzo 70 Pro दोन स्टोरेज व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. फोनचा 8GB + 128GB व्हेरिएंट 18,999 रुपयांना लाँच झाला आहे. तर, 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची अर्ली बर्ड सेल आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होईल. या फोनची खुली विक्री 22 मार्चपासून Amazon वर लाइव्ह होईल. ऑफर्समध्ये हँडसेटवर 2000 रुपयांची बँक सवलत देखील मिळेल.

Realme Narzo 70 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme ने आपल्या नवीन स्मार्टफोन Realme Narzo 70 Pro 5G मध्ये एक मोठा 6.67 इंच लांबीचा HD प्लस AMOLED डिस्प्ले प्रदान केला आहे. डिस्प्लेसह तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. सुरळीत कामकाजासाठी फोनमध्ये MediaTek Dimension 7050 चिपसेट बसवला आहे. ज्याच्या मदतीने वापरकर्त्यांना 5G तंत्रज्ञानाचा उत्तम अनुभव आणि अतिशय वेगवान गती मिळेल. स्टोरेज सेक्शनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज मिळेल. यासोबतच, यूजर्सना 8GB व्हर्चुअल रॅमचा सपोर्टही मिळतो. ज्याच्या मदतीने युजर्सना 16GB पर्यंत RAM वापरता येईल.

फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. यात OIS सपोर्ट, अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि टेलिफोटो लेन्ससह 50MP Sony IMX890 सेन्सर आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी हँडसेटमध्ये 32MP कॅमेरा आहे. फोन 5000mAh बॅटरीसह येतो, जी 67W SuperVOOC जलद चार्जिंगसह समर्थित आहे.

याव्यतिरिक्त, Realme Narzo 70 Pro 5G मध्ये Air Gesture आणि Rainwater Touch असे दोन नवे फीचर्स सादर करण्यात आले आहेत. या दोन्ही फीचर्सच्या मदतीने यूजर्सना एक अनोखा अनुभव मिळणार आहे. जर आपण Air Gesture फीचरबद्दल बोललो तर फोनला स्पर्श न करता स्क्रीनवर नेव्हिगेट करता येईल. Rainwater Touch फीचर्ससह स्क्रीन जरी ओली झाली तरी सहज वापरता येणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo