Realme च्या Realme Narzo 70 Pro 5G ची भारतीय लाँच डेट अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी आधीच केली होती. एवढेच नाही तर, यासाठी प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर मायक्रो वेबसाईटही लाईव्ह झाली आहे. Realme ने सांगितले होते की, ते मार्च 2024 मध्ये आपला आगामी Narzo स्मार्टफोन लॉन्च करतीळ. आता कंपनीने या फोनची रिलीज डेटही जाहीर केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme Narzo 70 Pro 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
हे सुद्धा वाचा: Price Cut! मोठ्या बॅटरीसह येणारा Oppo Pad Air 6000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News
Realme Narzo 70 Pro 5G स्मार्टफोन 19 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. हे लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. लाँच डेटसह कंपनीने फोनचे काही तपशील देखील उघड केले आहेत. 50MP Sony IMX890 कॅमेरा असलेला हा या विभागातील पहिला स्मार्टफोन असेल. फोनच्या बॅक पॅनलवर Duo Touch Glass डिझाइन दिले जाईल, असा देखील कंपनीचा दावा आहे. टीझर फोटोमध्ये फोन आर्क डिझाइनसह ड्युअल टोन फिनिशमध्ये येईल.
लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीने सांगितले आहे की, विशेषतः हा फोन एअर जेश्चरसह आणला जाईल. म्हणजेच तुम्ही हाताने जेश्चर करून फोन ऑपरेट करू शकाल. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Realme UI 5 वर चालेल. या स्मार्टफोनमध्ये फ्लॅट AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रीफ्रेश दर 120Hz असेल.
कंपनीने यासाठी Amazon आणि अधिकृत वेबसाइटवर पेजदेखील लाईव्ह केले आहे. यावर Notify Me बटन उपलब्ध आहे. कंपनी लोकांना या बटनवर क्लिक करून लकी ड्रॉ अंतर्गत इतर अनेक प्रोडक्ट्ससह फोन जिंकण्याची संधी देत आहे. एवढेच नाही तर, कंपनीने मायक्रो वेबसाइटवर असेही म्हटले आहे की, स्मार्टफोनवर 1000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध असेल. Realme च्या या आगामी स्मार्टफोनची विक्री तपशील आणि नेमकी किंमत फोन लाँच झाल्यावरच कळेल.