आजपासून, Amazon वर ग्राहकांसाठी Realme Narzo 70x 5G आणि Realme Narzo 70 5G फोनची विक्री सुरू झाल आहे. या सेलदरम्यान नव्या स्मार्टफोन्सवर अनेक ऑफर्स मिळणार आहेत. जर तुम्हाला 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही मागील आठवड्यात लाँच झालेले Realme Narzo 70 5G आणि Realme Narzo 70x 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोनची विक्री ग्राहकांसाठी आज म्हणजेच 29 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली आहे.
लक्षात घ्या की, Realme ब्रँडचे हे दोन्ही स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त, आपण हे Realme स्मार्टफोन्स ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करू शकता. Realme Narzo 70 5G मोबाइलच्या 6GB/128GB व्हेरिएंट आणि 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 14,999 रुपये आणि 15,999 रुपये आहे. हा फोन आइस ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन शेडमध्ये खरेदी करता येईल. या फोनसह, तुम्हाला कूपन डिस्काउंटद्वारे 1,000 रुपयांची सूट मिळेल.
तर, दुसरीकडे Realme Narzo 70x 5G फोनचे दोन प्रकार उपलब्ध आहेत, 4GB/128GB प्रकार आणि 6GB/128GB प्रकार. या दोन्ही मॉडेल्सच्या किंमती अनुक्रमे 10,999 रुपये आणि 11,999 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. 4GB व्हेरिएंट खरेदी करताना तुम्हाला बँक कार्डद्वारे 1,000 रुपयांची सूट मिळेल. तर, 6GB व्हेरिएंट खरेदी करताना तुम्हाला 1,500 रुपयांची सूट मिळेल.
Realme Narzo 70 5G फोनमध्ये 240 Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.67 इंच लांबीचा फुल-HD+ रिझॉल्युशन AMOLED डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7050 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनच्या मागील पॅनलमध्ये 2MP सेकंडरी कॅमेरा 50MP प्रायमरी सेन्सरसह उपलब्ध असेल. सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. यामध्ये पॉवरचा 5000mAh बॅटरी मिळेल.
Realme Narzo 70x 5G फोनमध्ये 6.72-इंच लांबीचा फुल-HD+ रिझोल्यूशनसह LCD डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या Realme फोनमध्ये MediaTek Dimension 6100+ चिपसेट वापरण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा उपलब्ध असेल, 50MP प्रायमरी कॅमेरासह 2MP चा सेकंडरी कॅमेरा मिळतो. तर, सेल्फीसाठी 8MP फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 500 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45 वॉट सुपरव्हीओओसी फास्ट चार्जला सपोर्ट करते.