प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चे दोन नवे स्मार्टफोन Realme Narzo 70 5G आणि Narzo 70x 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन कंपनीने 15,000 रुपयांच्या आत सादर केले आहेत. फोनमध्ये विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय, या दोन्ही फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme Narzo 70 5G आणि 70x 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: Best Offer! Google Pixel 7 Pro फोनवर मिळतोय तब्बल 21,000 रुपयांचा Discount, ‘ही’ डील पुन्हा मिळणार नाही
कंपनीने Realme Narzo 70 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. तर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. या फोनमध्ये मिस्टी फॉरेस्ट ग्रीन आणि स्नो माउंटन ब्लू कलर पर्याय उपलब्ध आहेत.
याव्यतिरिक्त, Realme Narzo 70x 5G फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. तर, फोनचे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये येते, ज्याची किंमत 13,499 रुपये आहे. या फोनमध्ये मिस्टी फॉरेस्ट ग्रीन आणि स्नो माउंटन ब्लू कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आले आहेत.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Realme Narzo 70 5G फोनच्या दोन्ही व्हेरिएंटवर 1000 रुपयांची सवलत ऑफर मिळेल. तसेच, Realme Narzo 70x 5G च्या 4GB रॅम मॉडेलवर 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, 6GB रॅम व्हेरिएंटच्या खरेदीवर तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळणार आहे.
Realme Narzo 70 5G फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरचा फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
Realme Narzo 70x 5G फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. याशिवाय, हा फोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये देखील 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.