Realme Narzo 70 5G ची अर्ली बर्ड Sale सुरु, जाणून घ्या किंमत आणि अप्रतिम ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News 

Realme Narzo 70 5G ची अर्ली बर्ड Sale सुरु, जाणून घ्या किंमत आणि अप्रतिम ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News 
HIGHLIGHTS

Realme Narzo 70 5G स्मार्टफोन बुधवारी 24 एप्रिल 2024 रोजी भारतात लाँच

Realme Narzo 70 5G ची अर्ली बर्ड सेल सुरु

या डिव्हाइसवर 1000 रुपयांची सूट देखील दिली जात आहे.

Realme Narzo 70 5G स्मार्टफोन बुधवारी 24 एप्रिल 2024 रोजी भारतात लाँच करण्यात आला. त्यानंतर, Realme Narzo 70 5G ची अर्ली बर्ड सेल आज म्हणजेच 25 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर सुरू झाली आहे. हा स्मार्टफोन खरेदी केल्यावर, तुम्हाला सूट आणि परवडणारे EMI ऑप्शन देखील मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात या फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि सेलमध्ये उपलब्ध सर्व ऑफर्स-

Realme Narzo 70 5G
Realme Narzo 70 5G

Realme Narzo 70 5G ची किंमत आणि ऑफर्स

Realme Narzo 70 5G भारतीय बाजारपेठेत दोन स्टोरेज मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत म्हणजे 6GB + 128GB स्टोरेज मॉडेल 15,999 रुपये आहे. फोनचा 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 16,999 रुपयांना उपलब्ध आहे. या डिव्हाइसवर 1000 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. तसेच, हँडसेटवर नो-कॉस्ट EMI उपलब्ध आहे. हे मिस्टी फॉरेस्ट ग्रीन आणि स्नो माउंटन ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Realme Narzo 70 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 70 5G मध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉरमन्ससाठी यात MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. सुरक्षेसाठी यात फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये एक मजबूत 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Realme Narzo 70 5G Features
Realme Narzo 70 5G Features

फोटोग्राफीसाठी उत्कृष्ट फोटो या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP सेकंडरी लेन्स आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि आकर्षक सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय लाईव्ह, नाईट, पोर्ट्रेट आणि स्लो-मो सारखे कॅमेरा फीचर्सही स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo