Realme Narzo 60x 5G स्मार्टफोन नुकतेच भारतात लाँच करण्यात आला आहे. हा Realme चा बजेट स्मार्टफोन आहे. दरम्यान, या फोनची पहिली विक्री दुपारी 12 वाजतापासून सुरू होत आहे. जर तुम्हाला हा फोन स्वस्तात विकत घ्यायचा असेल, तर आज तुम्हाला मोठी संधी मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जात आहे.
Realme ने Realme Narzo 60X 5G सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये येतो. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक 1000 रुपयांच्या सवलतीत फोन खरेदी करू शकतील. अशा परिस्थितीत, हा स्मार्टफोन तुम्ही पहिल्या सेलमध्ये 11,999 रुपयांना खरेदी करू शकता.
फोनमध्ये 6.72 इंच फुल HD + LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. LCDचा मुख्य फायदा म्हणजे, तो कमी किमतीचा आणि ऊर्जा-कार्यक्षम आहे. त्याबरोबरच, हा डिस्प्ले लाईटर, थिनर आणि फ्लेक्सिबल आहे. फोन Android 13 आधारित Realme UI 4.0 वर काम करतो.
आम्ही तुम्हाला सांगतो की, यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 6100+ प्रोसेसर आहे. Dimensity 6100+ अपवादात्मक उर्जा कार्यक्षमता, डिस्प्ले, उत्कृष्ट गेमिंग अनुभव, AI-पावर्ड कॅमेरा टेक्नॉलॉजीज, जलद आणि विश्वासार्ह 5G कनेक्टिव्हिटी ऑफर करतो.
फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. त्याचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट सेन्सर उपलब्ध आहे. फोन 5000mAh बॅटरी आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. 5000mAh बॅटरी तुमचा फोन सतत चार्ज न करता, 13 तासांचा व्हिडिओ पाहण्यासाठी, 27 तासांचा कॉल टाइम आणि 40 तास स्टँडबाय टाइम ऑफर करते.