Realme ने अलीकडेच नवीन बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. होय, आम्ही नुकतेच लाँच झालेल्या Realme Narzo 60x 5G स्मार्टफोन्सबद्दल बोलत आहोत. यासह कंपनीने Realme Buds T300 देखील भारतात लाँच केले आहेत. त्यानंतर आज 12 सप्टेंबर रोजी हा सेल पहिल्यांदा सेलसाठी जातोय, पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला बरेच ऑफर्स मिळणार आहेत. चला तर मग बघुयात नवीनतम फोनवर कोणत्या ऑफर्सचा वर्षाव होतोय.
वर सांगितल्याप्रमाणे, आज 12 सप्टेंबरला हा फोन प्रथमच फ्लॅश सेलसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. Amazon आणि Realme च्या अधिकृत वेबसाइटवर दुपारी 12 वाजता सेल सुरू झाली आहे.
Realme Narzo 60x ची भारतात 4GB + 128GB व्हेरियंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याबरोबरच, हा स्मार्टफोन 6GB + 128GB व्हेरिएंटमध्ये देखील येतो, ज्याची किंमत 14,499 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर म्हणून Realme कूपनसह 1000 रुपयांची त्वरित सूट देत आहे. Realme Store द्वारे हँडसेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 6 महिन्यांचे मोफत स्क्रीन नुकसान संरक्षण देखील मिळेल, ज्याची किंमत 699 रुपये आहे.
Realme Narzo 60x 5G मध्ये 6.72-इंच लांबीचा LCD फुल HD+ डिस्प्ले समाविष्ट आहे आणि यामध्ये 120 Hz रिफ्रेश रेट आणि 180 Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. त्याबरोबरच, डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह येतो. Realme Narzo 60x च्या ड्युअल रियर कॅमेरामध्ये 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि पोर्ट्रेट लेन्ससह 2MP चा सेकंडरी सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 8MPचा कॅमेरा सेंसर आहे.
प्रोसेसर म्हणून यात Mali G57 GPU सह ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6100+ आहे. Realme चा हा फोन Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर काम करतो. पॉवरसाठी, Realme Narzo 60x मध्ये 33W वायर्ड SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी कमी वापरासह दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवते. सुरक्षिततेसाठी, फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.