Realme Narzo 60X 5G Launched: नवा स्मार्टफोन Buds T300सह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Realme Narzo 60X 5G Launched: नवा स्मार्टफोन Buds T300सह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

Realme Narzo 60X 5G स्मार्टफोन Realme Buds T300 सह भारतात लाँच

Realme Narzo 60X 5G च्या बेस व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये

हा फोन 29 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे.

Realme चा नवा स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. होय, Realme Narzo 60X 5G स्मार्टफोन Realme Buds T300 सह भारतात लाँच झाला आहे. Narzo 60 आणि Narzo 60 Pro 5G नंतर रियलमीचा हा फोन या सिरीजमधील तिसरा फोन आहे. स्मार्टफोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस वर्तुळाकार रिंगसारखा कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. हा Realme फोन अलीकडे लाँच झालेल्या Realme 11X 5G ची टोन्ड डाउन आवृत्ती आहे, असे म्हटले जाते. 

Realme Narzo 60X 5G ची किंमत

तुम्ही Realme Narzo 60X 5G स्मार्टफोन 4GB RAM + 128GB आणि 6GB RAM + 128GB या दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर, त्याचा टॉप व्हेरिएंट 14,499 रुपयांना येतो. हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये आणला गेला आहे. स्टेलर ग्रीन आणि नेबुला पर्पल या दोन रंगात तुम्ही दोन खरेदी करू शकता.

 

 

उपलब्धता

 या Realme स्मार्टफोनचा पहिला सेल 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर आयोजित केला जाईल. पहिल्या सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर तुम्हाला 1,000 रुपयांची झटपट सूट मिळेल. यासह Realme Buds T300 देखील लाँच झाले आहेत, ज्यांची किंमत 2,299 रुपये आहे. बड्सची विक्री 12 सप्टेंबर रोजी Amazon वर होणार आहे.

Realme Narzo 60X 5G चे तपशील 

हा Realme फोन 6.72-इंच लांबीच्या डायनॅमिक डिस्प्लेसह येतो. फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह FHD+ रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास बसवण्यात आला आहे. हा Realme फोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरवर काम करतो. हा प्रोसेसर जलद ऍप रिस्पॉन्स, गेममधील जलद FPS आणि चांगले कनेक्ट केलेले अनुभव यासाठी अपवादात्मक कामगिरी प्रदान करतो. 

realme narzo 60x 5g

यात 6GB रॅम + 128GB अंतर्गत स्टोरेजसाठी सपोर्ट आहे. फोनची रॅम अक्षरशः 6GB पर्यंत वाढवता येते. तसेच, त्याचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा Realme स्मार्टफोन Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर काम करतो. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. 

या स्मार्टफोनच्या रियरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये LED फ्लॅश लाईट देण्यात आले आहेत. फोनमध्ये 50MP मेन आणि 2MP सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. हा फोन 29 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo