लोकप्रिय कंपनीने Realme Narzo 60 सिरीज भारतात लाँच केली आहे. कंपनीने या सिरीजअंतर्गत Realme Narzo 60 5G आणि Realme Narzo 60 Pro 5G हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. याव्यतिरिक्त, Realme Buds Wireless 3 देखील लाँच करण्यात आले आहे. चला तर मग वेळ न घालवता बघुयात Realme Narzo 60 सिरीजची किमंत, फीचर्स आणि स्पेक्स.
कंपनीने Realme Narzo 60 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. फोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. तर, 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. दोन्ही व्हेरिएंट 20,000 रुपयांअंतर्गत लाँच करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, Realme Narzo 60 Pro 5G स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. तर, 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. त्याबरोबरच, टॉप 12GB+1TB मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे.
वरील दोन्ही स्मार्टफोनची विक्री 15 जुलैपासून Realme India आणि Amazon वर सुरु होईल. विशेष ऑफर अंतर्गत, प्रो फोनवर 1500 रुपयांची सूट दिली जाईल. त्याच वेळी, बेस व्हेरिएंटवर 1,000 रुपयांची सूट मिळेल. त्यांचे प्री-बुकिंग आजपासून सुरू झाले आहे.
Realme Narzo 60 स्मार्टफोनमध्ये 6.43-इंच लांबीच्या FHD + AMOLED डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. याशिवाय हा फोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन Android 13 आधारित Realme UI 4.0 वर काम करतो. फोटोग्राफीसाठी यात 64MP प्रायमरी कॅमेरा, 2MP सेकंडरी कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये बॅटरी 5000mAh ची आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.