Realme Narzo 60 Launch: आगामी सिरीज लाँच होण्यासाठी सज्ज, मिळेल सर्वात जास्त स्टोरेज?

Updated on 21-Jun-2023
HIGHLIGHTS

Amazonवर Realme Narzo 60 सिरीजचा टीजर सादर

सीरीजच्या लाँच संबंधित माहिती 22 जूनला म्हणजेच उद्या दिली जाईल.

नवी नारझो सिरीज MediaTek Dimensity 1080सह सज्ज असण्याची शक्यता

Realme Narzo 60 Launch: Realme आपल्या लोकप्रिय Narzo सिरीजचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने इ-कॉमर्स साईट Amazonवर Realme Narzo 60 सिरीजचा टीजर देखील सादर केला आहे. लाँच डेट अद्याप कन्फर्म झालेली नाहीये, मात्र कंपनी लवकरच याबाबत अधिकृत माहिती देणार आहे. त्याआधी आगामी सिरीजबद्दल काही लीक्स देखील पुढे आले आहेत. पुढील महिन्यात ही नवीन नारझो मालिका सादर केली जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे. 

Mission Narzo

आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon वर प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये 'Mission Narzo' ही टॅगलाइन वापरण्यात आली आहे. टीझरमध्ये 2,50,000 हून अधिक फोटो संग्रहित होतील, असा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजेच Narzo 60 सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त स्टोरेज असल्याचे सांगितले जात आहे.  कंपनीचे म्हणणे आहे की, सीरीजच्या लाँच संबंधित माहिती 22 जूनला म्हणजेच उद्या दिली जाईल. 

Realme Narzo 60 सिरीज तपशील लीक्स

लीक्सनुसार, Realme Narzo 60 मध्ये 6.43-इंच लांबीचा फुल HD+AMOLED डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह मिळेल. नवी नारझो सिरीज MediaTek Dimensity 1080सह सज्ज असण्याची शक्यता आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येऊ शकतो. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात येईल, यासह फेस अनलॉक फिचर देखील मिळेल. 

 

https://twitter.com/realmenarzoIN/status/1671042698491437058?ref_src=twsrc%5Etfw

 

याबरोबरच, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, ज्यासह 33W फास्ट चार्जिंग असण्याची शक्यता आहे. तसेच, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप येईल, ज्यासह 64MP प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2MPचा पोट्रेट कॅमेरा असू शकतो. तसेच आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा मिळेल. 

टीप: लक्षात घ्या की, वरील हे फोन्सचे अपेक्षित तपशील आहेत. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :