Realme Narzo 60 Leaks: आगामी स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म, अन्य डिटेल्स लीक
पनीने ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर या सिरीजची लॉन्च डेट कन्फर्म केली आहे.
Realme Narzo 60 सिरीज पुढील आठवड्यात 26 जून रोजी लाँच करण्यात येईल.
सिरीजमध्ये दोन Narzo 60 5G आणि Narzo 60 Pro 5G हे दोन फोन सादर करण्यात येतील.
Realme Narzo 60 Leaks: Realme Narzo 60 सिरीजबद्दल बऱ्याच चर्चा टेक विश्वात सुरु आहेत. आता अखेर या आगामी स्मार्टफोनची लॉन्च डेट निश्चित झाली आहे. कंपनीने ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर या सिरीजची लॉन्च डेट कन्फर्म केली आहे. Realme Narzo बद्दल कंपनीने दावा केला आहे की, सीरिजच्या फोनमध्ये अडीच लाखांहून अधिक फोटो स्टोअर केले जाऊ शकतात. म्हणजेच यात सर्वात अधिक स्टोरेज मिळणार आहे, असा कंपनीने दावा केला आहे.
Realme Narzo 60 सिरीज लाँच डेट
Realme Narzo 60 सिरीज पुढील आठवड्यात 26 जून रोजी लाँच करण्यात येईल. Amazon वर बनवलेल्या मायक्रोसाइटवर Realme ने 26 जून रोजी सिरीजची लाँच डेट निश्चित केली आहे.
Realme Narzo 60 चे संभावित फीचर्स
Realme Narzo 60 सिरीजमध्ये दोन Narzo 60 5G आणि Narzo 60 Pro 5G हे दोन फोन सादर करण्यात येतील. Realme Narzo 60 सिरीजमध्ये 6.43-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येईल. डिस्प्लेमध्ये पंच-होल सेल्फी कॅमेरा डिझाइन मिळू शकतो. कंपनीचा हा आगामी फोन MediaTek Dimensity 6020 SoC सह येणार आहे. फोन 8GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह येऊ शकतो. स्टोरेज microSD कार्डद्वारे वाढवता येणार आहे.
बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W USB Type C चार्जिंग फीचर मिळण्याची शक्यता आहे. या फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यामध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा असेल. तर, सेल्फीसाठी 16MP कॅमेरा दिला जाईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile